19 May 2024 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

Trent Share Price | टाटा गृपच्या हा शेअर धुमाकूळ घालणार, ट्रेंट शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण काय?

Trent Share Price

Trent Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. नुकताच ट्रेंट कंपनीने 1,00,000 कोटी रुपये बाजार भांडवलाचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. मागील 10 वर्षांमध्ये ट्रेंट कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरधारकांना मालामाल केले आहे. टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे 37.01 टक्के भाग भांडवल टाटा समूहाने धारण केले आहे. ट्रेंट लिमिटेड कंपनीची स्थापना रिटेल क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी म्हणून झाली होती.

ट्रेंट कंपनी व्हॅल्यू फॅशनपासून ते लक्झरी उत्पादनांपर्यंत सर्व वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ही कंपनी वेस्टसाइड आणि झुडिओ यासारखे आउटलेट देखील चालवत आहे. यासह ट्रेंट कंपनीने पोशाख, सौंदर्य उत्पादने आणि फॅशन क्षेत्रात देखील आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी ट्रेंट स्टॉक 0.43 टक्के वाढीसह 2,978.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

31 मार्च 2023 पर्यंतच्या अपडेटनुसार ट्रेंट कंपनीने भारतात आपले एक प्रचंड मोठे नेटवर्क निर्माण केले आहे. ट्रेंट कंपनी भारतभरात 90 शहरांमध्ये 214 वेस्टसाइड स्टोअर्स आणि 119 शहरांमध्ये 352 झुडिओ स्टोअर्सचे यशस्वी संचालन करत आहे. ट्रेंट कंपनी आपली उपकंपनी असलेल्या ट्रेंट हायपरमार्केट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत स्पेनच्या Inditex आणि Massimo Dutti या कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम स्थापन करून आपल्या व्यवसाय विस्तार करत आहे.

ट्रेंट कंपनी टेस्को पीएलसी यूके सोबतच्या संयुक्त उपक्रम स्थापन करून ट्रेंट हायपरमार्केट प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनीच्या माध्यमातून भारतात किरकोळ किराणा विक्री व्यवसायात प्रवेश करत आहेत. ट्रेंट कंपनी आपल्या उपकंपनीच्या माध्यमातून भारतात 10 शहरांमध्ये 63 ठिकाणी किराणा स्टार स्टोअर्स चालवत आहेत.

ट्रेंट कंपनी भारतात 20 झारा स्टोअर्ससह 11 शहरात आणि तीन मॅसिमो डुट्टी आउटलेट्ससह दोन शहरांमध्ये आपले आउटलेट चालवत आहेत. ट्रेंट कंपनीने 2023 या वर्षात अप्रतिम व्यवसायिक कामगिरी केली आहे. 2023 या वर्षात ट्रेंट कंपनीच्या स्टॉकची किंमत 119.77 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Trent Share Price NSE Live 26 December 2023.

हॅशटॅग्स

#Trent Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x