18 May 2024 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Sadhana Nitro Share Price | असे श्रीमंत व्हा! 92 रुपयाचा शेअर देईल 100 टक्क्यांहून अधिक परतावा, तज्ज्ञांचा फायद्याचा सल्ला

Sadhana Nitro Share Price

Sadhana Nitro Share Price | साधना नायट्रो केमिकल कंपनीच्या पेनी स्टॉकने 2023 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना अक्षरशः मालामाल केले होते. आता नवीन वर्षात देखील हा स्टॉक अशीच कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी साधना नायट्रो केम कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

तज्ञांच्या मते, नवीन वर्षात साधना नायट्रो केम कंपनीचे शेअर्स 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. प्रॉफिटमार्ट रिसर्च फर्मच्या अहवालानुसार, साधना नायट्रो केमिकल कंपनीचे शेअर्स पुढील 18 महिन्यांत 200 रुपये किंमत स्पर्श करतील. आज बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी साधना नायट्रो केमिकल कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के वाढीसह 92.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

नवीन वर्षाच्या दुसऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजेच मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधना नायट्रो केमिकल कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 121.23 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 25 ऑगस्ट 2023 रोजी साधना नायट्रो केमिकल कंपनीचे शेअर्स 66 रुपये किमतीवर पडले होते. साधना नायट्रो केमिकल या कंपनीची स्थापना 1973 साली झाली होती.

साधना नायट्रो केमिकल ही कंपनी एक आघाडीची विशेष रसायन उत्पादन करणारी कंपनी म्हणून अग्रणी मानली जाते. ही कंपनी प्रामुख्याने नायट्रो बेंझिन, मिथेनिल ऍसिड, एमएपी इत्यादी बेंझिन आधारित संयुगांवर आधारित रसायने बनवणारी कंपनी आहे. साधना नायट्रो केमिकल कंपनी जे रसायने बनवते, ते कागद, फार्मा, अॅग्रोकेमिकल्स, थर्मल डाईज, लाईट स्टॅबिलायझर्स, एरोस्पेस आणि रंग आणि इंटरमीडिएट्स यांसारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जातात

साधना नायट्रो केमिकल कंपनीचे उत्पादन सुविधा केंद्र महाराष्ट्रात रोहा या ठिकाणी स्थित आहे. साधना नायट्रो केमिकल कंपनीच्या एकूण भाग भांडवलपैकी 71.12 टक्के वाटा प्रवर्तकांनी धारण केला आहे. तर कंपनीच्या सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 28.88 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. साधना नायट्रो केमिकल या कंपनीच्या प्रवर्तक गटात 9 सदस्य आहेत. या कंपनीचे मुख्य प्रवर्तक असित झवेरी असून त्यांनी कंपनीचे 1,41,66,630 शेअर्स होल्ड केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sadhana Nitro Share Price NSE 03 January 2024.

हॅशटॅग्स

Sadhana Nitro Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x