19 May 2024 1:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर तेजीत वाढतोय, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर, फायदा घेणार?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने चालू आर्थिक वर्षाच्या 2023-24 तीन तिमाहीत मजबूत कामगिरी केली आहे. मार्च 2023 मध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 185 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 340 रुपये किमतीजवळ पोहचले आहेत.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील दोन महिन्यांपासून टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स नियमितपणे वाढत आहेत. आज देखील हा स्टॉक चांगल्या तेजीत वाढत आहे.

5 जानेवारी 2024 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 349.65 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के वाढीसह 341.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ऑक्टोबर 2023 अखेरीपासून ते आतपर्यंत टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 46 टक्के मजबूत झाले आहेत. टाटा पॉवर कंपनीकडे सध्या 5.5 GW क्षमतेचा स्वच्छ ऊर्जा पोर्टफोलिओ आहे. 2030 पर्यंत कंपनीने आपली क्षमता 20 GW वर नेण्याचे निर्धारित केले आहे. टाटा पॉवर कंपनीची 3.7 GW ऊर्जा निर्मिती क्षमता निर्माणाधीन आहे.

मजबूत डील फ्लो, ऊर्जा निर्मिती क्षमता वाढ आणि ट्रान्समिशन च्या आधारावर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने आर्थिक वर्ष 2027 पर्यंत कंपनीचा महसूल, EBITDA आणि PAT दुप्पट होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, देशात विजेची मागणी वाढत चालली आहे. आणि टाटा पॉवर कंपनी देखील आपली ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवत चालली आहे. त्यामुळे कंपनीला याचा अधिक फायदा होऊ शकतो.

याशिवाय टाटा पॉवर कंपनी ट्रान्समिशन व्यवसायात देखील प्रवेश करण्याची योजना आखत आहे. भविष्यात टाटा पॉवर कंपनीने सौर ऊर्जा निर्मितीवर अधिक भाग देण्याचे निश्चित केले आहे. टाटा पॉवर कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. यासह सौर आणि पवन ऊर्जा उत्पादनात कंपनीने आपली मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे.

टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते, टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी वाढ होऊ शकते. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स दैनिक चार्ट पॅटर्नवर मजबूतीचे प्रदर्शन करत आहेत. गुंतवणूकदारांनी टाटा पॉवर स्टॉकवर पैसे लावताना 325 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावला पाहिजे. टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स पुढील काळात 375 रुपये किंमत स्पर्श करू शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE Live 08 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x