16 May 2024 1:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Yes Bank Share Price | 25 रुपयाच्या येस बँक शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून तेजीत वाढणारा येस बँक स्टॉक आज मोठ्या प्रमाणात विक्रीच्या दबावाला तोंड देत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह 26.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आज या बँकिंग स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली सुरू झाली आहे.

काल दिवसा अखेर येस बँक स्टॉक 4 टक्के वाढीसह 25.67 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. एवढ्या सलग तेजीनंतर शेअरमध्ये किंचित नफा वसुली होणे, क्रमप्राप्त आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 73,830.96 कोटी रुपये किमतीवर पोहचले आहे. आज बुधवार दिनांक 17 जानेवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.95 टक्के घसरणीसह 25.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

येस बँकेच्या शेअर्सवर अनेक तज्ञांचे लक्ष असते. या तज्ज्ञांच्या मते येस बँक स्टॉक पुढील काळात आणखी तेजीत वाढू शकतो. काही तज्ञांनी येस बँक स्टॉक 30 ते 40 रुपये किमतीवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जर तुमच्याकडे येस बँक स्टॉक असेल, तर तज्ञांनी शेअर होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.

मात्र 22-23 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावायला विसरू नका. मागील 2 महिन्यांत येस बँक स्टॉक मजबूत वाढला आहे. दोन महिन्यांपूर्वी येस बँक स्टॉक 15.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर आता हा स्टॉक 26 रुपये किमतीच्या जवळ ट्रेड करत आहे.

प्रभुदास लिलाधर फर्मच्या मते, येस बँक स्टॉक पुढील काही महिन्यांत 34 रुपये ते 40 रुपये दरम्यान ट्रेड करू शकतो. मात्र डाऊन साईडवर हा स्टॉक 22 रुपयेच्या खाली जाण्याची शक्यता आहे. 23 ऑक्टोबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 14.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. या किमतीवर ज्या लोकांनी येस बँक स्टॉक खरेदी केला होता, त्यांना 85 टक्के नफा मिळाला आहे.

मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने लोकांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 हे नवीन वर्ष सुरू होऊन काही दिवसच झाले आहे, मात्र या काळात देखील येस बँक स्टॉकने लोकांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 17 January 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x