19 May 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल
x

Servotech Share Price | शेअरची किंमत 90 रुपये! 2 दिवसात 10% परतावा, कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, वेळीच खरेदी करा

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 86.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 120 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर मिळाली आहे. आज बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 90.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेबीला दिलेल्या माहितीत सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, त्यांना भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने मोठी ऑर्डर दिली आहे. BPCL कंपनीने सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीला 1800 DC फास्ट ईव्ही चार्जर उभारण्यासाठी 120 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला उत्पादन, पुरवठा आणि स्थापना अशा सर्व सुविधा प्रदान करायचे आहे. BPCL कंपनी ई-ड्राइव्ह प्रकल्पाचा एक भाग म्हणून भारतातील विविध पेट्रोल पंपावर 1800 EV चार्जर स्थापन करणार आहे.

मागील एका वर्षात सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 254 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका वर्षभरापूर्वी या कंपनीचे शेअर्स 24 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 100 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 16.48 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1 लाख 83,520.65 कोटी रुपये आहे.

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने मजबूत कमाई केली आहे. रिफायनिंग मार्जिन आणि इंधन विक्रीवरील उच्च मार्जिनमुळे BPCL कंपनीच्या नफ्यात भरघोस वाढ पाहायला मिळाली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मधील डिसेंबर तिमाहीत BPCL कंपनीने 1,747.01 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत या कंपनीचा नफा 8,243.55 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE Live 31 January 2024.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x