19 May 2024 2:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा
x

SBI Share Price | एसबीआय FD नव्हे! SBI शेअर अल्पावधीत FD वार्षिक व्याजदरांपेक्षा दुप्पट-तिप्पट परतावा देईल

SBI Share Price

SBI Share Price | एसबीआयचा शेअर सातत्याने चांगला परतावा देत आहे. पण तरीही ते आणखी चांगले देईल. ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवाल यांनी एसबीआयमध्ये खरेदी करण्याचा सल्ला देत खूप चांगले प्राइस टार्गेट जारी केले आहे. जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर.

सध्या एसबीआयचा शेअर आपल्या उच्चांकी दराच्या जवळपास व्यवहार करत आहे. एसबीआयचा शेअर शुक्रवारी ७५४.७० रुपयांवर बंद झाला. एनएसईवर एसबीआयची एक वर्षाची किमान पातळी 501.55 रुपये आहे, तर कमाल पातळी 774.60 रुपये आहे. त्यामुळे एसबीआय आपल्या सर्वोच्च पातळीच्या आसपास व्यवहार करत असल्याचे दिसून येत आहे.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवा यांनी स्टेट बँक ऑफ इंडियावर (SBI) एक रिसर्च रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये मोतीलाल ओसवार यांनी एसबीआयचे नवे टार्गेट जाहीर केले आहे.

मोतीलाल ओसवाल यांच्या मते, एसबीआयचा शेअर पुढील वर्षभरात ८६० रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो. म्हणजेच एसबीआयचा शेअर आता जवळपास १६ टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेज हाऊसच्या म्हणण्यानुसार, कर्ज आणि कॉर्पोरेट मागणीत सुधारणा झाल्यामुळे एसबीआय आर्थिक वर्ष 2023 ते 2026 पर्यंत 13-14% कर्ज वाढीसाठी चांगल्या स्थितीत आहे.

जाणून घ्या एसबीआयच्या शेअर्सचा परतावा
परताव्याचा विचार केला तर एसबीआयचा शेअर सातत्याने चांगला परतावा देत आहे.

* 1 महिन्यात एसबीआयच्या शेअरने जवळपास 18.50 टक्के परतावा दिला आहे.
* 3 महिन्यांत एसबीआयच्या शेअरने जवळपास 29.09 टक्के परतावा दिला आहे.
* 1 जानेवारी 2024 पासून एसबीआयच्या शेअरने जवळपास 17.55 टक्के परतावा दिला आहे.
* 1 वर्षात एसबीआयच्या शेअरने जवळपास 39.73 टक्के परतावा दिला आहे.
* 3 वर्षात एसबीआयच्या शेअरने जवळपास 87.57 टक्के परतावा दिला आहे.

वेतन आणि पेन्शनसाठी एकरकमी ७,१०० कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाची डिसेंबर तिमाही (ऑक्टोबर-डिसेंबर २०२३) ३५ टक्क्यांनी घसरून ९,१६४ कोटी रुपयांवर आली होती. मात्र, बँकेचे एकूण उत्पन्न गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील ९८,०८४ कोटी रुपयांवरून १,१८,१९३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आलोच्य तिमाहीत बँकेचे व्याज उत्पन्न वाढून 1,06,734 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 86,616 कोटी रुपये होते. बँकेची सकल अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) डिसेंबर २०२३ अखेर ीस एकूण कर्जाच्या २.४२ टक्क्यांवर आली आहे, जी गेल्या वर्षी ३.१४ टक्के होती. त्याचप्रमाणे तिसऱ्या तिमाहीअखेर निव्वळ एनपीएही गेल्या वर्षीच्या ०.७७ टक्क्यांवरून ०.६४ टक्क्यांवर आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : SBI Share Price NSE Live check details 18 February 2024.

हॅशटॅग्स

#SBI Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x