17 May 2024 11:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी
x

RVNL Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा RVNL शेअर पुन्हा बंपर परतावा देणार? तज्ञांचे काय म्हटले जाणून घ्या

RVNL Share Price

RVNL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 200 अंकांच्या वाढीसह 72894 अंकांवर ट्रेड करत होते. निफ्टी-50 निर्देशांक 22151 अंकांवर ट्रेड करत होता. मागील काही वर्षात अनेक कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. यामध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत.

आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीचे एकूण बाजार भांडवल 55470 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 0.73 टक्के घसरणीसह 258.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 124 रुपये या नीचांक किंमत पातळीवरून 114 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 66 रुपये या किमतीवरून 301 टक्के नफा कमावून दिला आहे. 12 एप्रिल 2019 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक तब्बल 1250 टक्के वाढला आहे.

आरव्हीएनएल या सरकारी रेल्वे कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 65000 कोटी रुपये आहे. सर्व ऑर्डरपैकी 50 टक्के ऑर्डर रेल्वे प्रकल्पांशी संबंधित आहेत. रेल विकास निगम लिमिटेड कंपनी आता इतर क्षेत्रात देखील व्यवसाय विस्तार करत आहे. मागील 8-10 महिन्यांत या रेल्वे कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. मात्र आता या शेअर्सवर अतिशय काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

तज्ञांच्या मते, आरव्हीएनएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. याच जोरावर ही कंपनी 2024 या वर्षात देखील मजबूत कामगिरी करु शकते. भारत-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचा रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला खूप फायदा होणार आहे. आरव्हीएनएल कंपनीला वंदे भारत रेल्वेचे देखील काम मिळाले आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स काही दिवसात 300 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 22 February 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(56)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x