19 May 2024 7:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Yes Bank Share Price | चार्टनुसार ब्रेकआउटनंतर येस बँक शेअर मजबूत तेजीत येणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 27.33 रुपये किमतीवर पोहचले होते. आज मात्र या बँकेच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.

येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 16 टक्के घसरले आहेत. येस बँक स्टॉक आपल्या मूव्हिंग सरासरी किमतीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहेत. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.47 टक्के घसरणीसह 26.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2018 साली येस बँकेचे शेअर्स 380 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर या स्टॉकमध्ये जबरदस्त घसरण झाली होती. सध्या येस बँक स्टॉक आपल्या टेक्निकल चार्टवर मजबूत व्हॉल्यूमसह राऊंडिंग बॉटम पॅटर्न तयार करत आहे. हा पॅटर्न नीचांक किंमत पातळीपासून मजबूत वाढीचे संकेत देत आहे.

येस बँक स्टॉक 1 जून 2020 रोजी 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात येस बँक स्टॉक 4 टक्क्यांच्या वाढीसह 26.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्यानंतर शेअरमध्ये आणखी खरेदी वाढली. तर आज स्टॉकमध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे.

LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ज्ञांच्या मते, मासिक चार्टवर येस बँक स्टॉक ब्रेकआउट दिल्यानंतर मजबूत तेजीत वाढू शकतो. तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक जर 33 रुपये किमतीच्या पार गेला तर, अल्पवधित शेअर्स 50 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या किमतीवर गुंतवणुकदार येस बँक स्टॉक खरेदी करू शकतात. मात्र गुंतवणूक करतांना तज्ञांनी 21 रुपये किंमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक पुढील काळात 30 रूपये ते 32 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 23 February 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x