21 May 2024 12:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा
x

NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर! एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, शेअरला फायदा होणार?

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 146.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअर्समध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीला 10,000 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.

एनबीसीसी इंडिया कंपनीला पाच आम्रपाली प्रकल्प विकसित करण्यासाठी नोएडा प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. यासह एनबीसीसी इंडिया कंपनीने गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ लिमिटेड कंपनीसह दोन सामंजस्य करार संपन्न केले आहेत. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 1.64 टक्के घसरणीसह 143.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

एनबीसीसी इंडिया कंपनीने बुधवारी सेबी फाइलिंगमध्ये माहिती दिली की, “एनबीसीसी इंडिया लिमिटेड कंपनीला आम्रपालीच्या 10,000 कोटी रुपये मूल्याचे विद्यमान प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ग्रेटर नोएडा प्राधिकरणाने तत्वतः मंजुरी दिली आहे. या सर्व आम्रपाली प्रकल्पात सेंच्युरियन पार्क, GH-05, सेक्टर टेक झोन-IV, ग्रेटर नोएडा, गोल्फ होम्स, GH-02, सेक्टर-4, ग्रेटर नोएडा, लेजर पार्क, GH-01, टेक झोन IV, ग्रेटर नोएडा, लेजर व्हॅली , GH-02, टेक झोन-IV, ग्रेटर नोएडा, ड्रीम व्हॅली, GH-09, टेक झोन-IV, हे प्रकल्प सामील आहेत”.

मंगळवारी एनबीसीसी इंडिया कंपनीला सिक्कीम राज्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कायमस्वरूपी कॅम्पस बांधण्यासाठी 560 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहेत. मंगळवारी एनबीसीसी इंडिया कंपनीने सेबीला माहिती दिली की, त्यांना डुंग डुंग खामडोंग, गंगटोक, सिक्कीम येथे NIT सिक्कीम या संस्थेच्या कायमस्वरूपी कॅम्पसचे बांधकाम करण्यासाठी 560 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | NBCC Share Price NSE Live 23 February 2024.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x