21 May 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा
x

Servotech Share Price | अल्पावधीत मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, कंपनी ऑर्डरबुक मजबूत

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्व्होटेक पॉवर या इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सोल्यूशन प्रदान करणाऱ्या कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 97.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 93.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

6 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीच्या शेअरने 108.70 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 16.48 रुपये होती. शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व्होटेक पॉवर स्टॉक 4.56 टक्के वाढीसह 97.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

सर्व्होटक पॉवर सिस्टम्स कंपनीला सरकारी तेल कंपनी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने 1500 DC फास्ट ईव्ही चार्जर स्थापन करण्याची ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 102 कोटी रुपये असून त्यात 60 kW आणि 120 kW चे दोन चार्जर उभारायचे आहे. या ऑर्डर अंतर्गत सर्व्होटेक पॉवर कंपनीला संपूर्ण देशभरात DC-EV चार्जरचे उत्पादन, पुरवठा आणि स्थापना करण्याचे काम देण्यात आले आहे.

सर्व्होटेक पॉवर कंपनी हे चार्जर इतर ईव्ही चार्जर OEM कंपनीला देखील पुरवणार आहे. सर्व्होटेक पॉवर कंपनीच्या संचालिका सारिका भाटिया यांनी एका निवेदनात माहिती दिली की, “आम्हाला भारताच्या ई-मोबिलिटी क्रांतीचा भाग म्हणून काम करण्यास अभिमान वाटत आहे. सर्व्होटेक पॉवर कंपनी HPCL सोबत मिळून नवीन काम करण्यास उत्सुक आहे. भारतातील एक आघाडीची ईव्ही चार्जर निर्माता कंपनी म्हणून सर्व्होटेक पॉवर कंपनी भारतीयांचे ईव्ही वाहन वापरण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास कटिबध्द आहे”.

नुकताच दिग्गज ब्रोकरेज फर्मने सर्वोटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सवर एक अहवाल जाहीर केला आहे. तज्ञाच्या मते, सर्व्होटेक पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये 100 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. जर हा स्टॉक 100 रुपये किमतीच्या पार गेला तर, शेअर अल्पावधीत 112 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. गुंतवणूक करताना तज्ञांनी या स्टॉकवर 88 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE Live 24 February 2024.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x