19 May 2024 7:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

LIC Share Price | मागील 3 महिन्यात 73 टक्के परतावा देणारा LIC शेअर तेजीत येणार? तज्ज्ञांनी काय म्हटलं जाणून घ्या

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यापासुन गुंतवणूकदारांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरले होते. मात्र आता याच कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांना भरघोस नफा कमावून देत आहेत. आयपीओ लिस्टिंगनंतर बराच काळ या कंपनीचे शेअर्स तोट्यात ट्रेड करत होते.

मात्र सध्या एलआयसी कंपनीचे शेअर्स बेस्ट परफॉर्मर PSU स्टॉक म्हणून कामगिरी करत आहेत. नुकताच या कंपनीच्या शेअर्सने 1000 रुपये किमतीचा महत्वपूर्ण टप्पा पार केला आहे. आज सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 2.34 टक्के घसरणीसह 1,041.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 3 महिन्यांत एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के परतावा कमावून दिला आहे. एलआयसी कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली होती. एलआयसी कंपनीने नवनवीन योजना लाँच करून आपल्या व्यावयासात वाढ केल्याने शेअर्समध्ये देखील सकारात्मक वाढ निर्माण झाली.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या कंपनीचा व्यवसाय प्रीमियम दुहेरी अंकी राहू शकतो. एलआयसी कंपनीचे शेअर्स काही महिन्यापूर्वी स्वस्त किमतीवर म्हणजेच आपल्या IPO इशू किमतीच्या खाली ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढले आहेत.

डिसेंबर 2023 मध्ये सेबीने एलआयसी कंपनीला 2032 पर्यंत 25 टक्के सार्वजनिक शेअर होल्डिंग नियमांमध्ये सूट दिली होती. त्यामुळे अनेक ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली होती. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने एलआयसी स्टॉकवर 1040 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. नोव्हेंबर 2023 या महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने 12 टक्क्यांची वाढ नोंदवली. तर डिसेंबर 2023 मध्ये शेअरची किंमत 22 टक्के वाढली होती.

डिसेंबर 2023 तिमाहीच्या आर्थिक निकालांमुळे एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी टिकुन राहिली. एलआयसी कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 49 टक्के वाढला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 1066 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे 80 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहे. एलआयसी या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. तर मागील महिन्यातच या कंपनीच्या शेअर्सने आपली IPO इश्यू किंमत पार केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 26 February 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(99)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x