17 May 2024 7:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Adani Energy Share Price | अदानी एनर्जी शेअर्स मालामाल करणार, कंपनीची ऑर्डरबुक अजून मजबूत झाली, किती परतावा मिळेल?

Adani Energy Share Price

Adani Energy Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. अदानी एनर्जी सोल्युशन स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह 1189.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मंगळवारी मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी अदानी एनर्जी सोल्युशन स्टॉक 3.79 टक्के घसरणीसह 1,131.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन कंपनी सध्या स्मार्ट मीटर क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत आहेत. अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीला स्मार्ट मीटर सेक्टरमधील 25 टक्के वाटा काबीज करायचा आहे. कंपनीकडे सध्या मोठ्या वर्क ऑर्डर प्रलंबित आहे. अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीकडे मुंबईमधील 11 लाख स्मार्ट मीटर्सची ऑर्डर आहे. महाराष्ट्र डिस्कॉम कंपनीची 1.15 कोटी स्मार्ट मीटरची ऑर्डर आहे.

उत्तराखंड राज्यातून अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीला 6 लाख स्मार्ट मीटरची ऑर्डर मिळाली आहे. आंध्र प्रदेश राज्यातून 41 लाख मीटर्सची ऑर्डर मिळाली आहे. बिहार राज्यातून कंपनीला 28 लाख आणि आसाममधून 8 लाख स्मार्ट मीटर्सची ऑर्डर मिळाली आहे. अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीची सहयोगी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई या कंपनीने 7 लाख मीटर बसवले देखील आहेत.

सध्या अदानी एनर्जी सोल्युशन कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 2 कोटी स्मार्ट मीटरच्या ऑर्डर प्रलंबित आहेत. स्मार्ट मीटर बसविण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर अदानी पुढील 5 ते 7 वर्षांत 25 कोटी अधिक स्मार्ट मीटरची गरज भासणार आहे. अशा स्थितीत अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीला मजबूत फायदा होणार आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 32.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी एक वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 57.5 टक्के वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Energy Share Price NSE Live 27 February 2024.

हॅशटॅग्स

Adani Energy Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x