19 May 2024 1:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी
x

Shakti Pump Share Price | मल्टिबॅगर शेअर तेजीत येणार, स्टॉक अप्पर सर्किटवर आदळला, कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली

Shakti Pump Share Price

Shakti Pump Share Price | शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनीला पंप पुरवठा करण्याची 73 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. शक्ती पंप्स कंपनीला हरियाणा अक्षय ऊर्जा विभागाने 73 कोटी रुपये मूल्याची पंप पुरवठा करण्याची ऑर्डर दिली आहे. ( शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड कंपनी अंश )

शक्ती पंप्स इंडिया कंपनीला KUSUM-3 योजने अंतर्गत हरियाणा रिन्युएबल एनर्जी विभागाने चौथी वर्क ऑर्डर दिली आहे. आज गुरूवार दिनांक 14 मार्च 2024 रोजी शक्ती पंप्स इंडिया कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 1,218.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शक्ती पंप्स कंपनीचे शेअर्स 1162.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शक्ती पंप्स कंपनीला हरियाणा अक्षय ऊर्जा विभागाने सौर जल पंपिंग प्रणालीसाठी 2130 पंप पुरवठा करण्याचे काम दिले आहे. या ऑर्डरची पूर्तता करण्यासाठी कंपनीला 120 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 73.32 कोटी रुपये आहे. शक्ती पंप्स कंपनीने या वर्षी जानेवारी 2024 मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशन प्लेसमेंटद्वारे 200 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे.

मागील एका वर्षात शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना शेअर्स 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. 13 मार्च 2023 रोजी शक्ती पंप कंपनीचे शेअर्स 415.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1162.45 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 6 महिन्यांत शक्ती पंप्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 47 टक्क्यांनी वाढली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 787.15 रुपयेवरून वाढून 1162.45 रुपये किमतीवर पोहचले आहेत. शक्ती पंप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1599.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 388.70 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shakti Pump Share Price NSE Live 14 March 2024.

हॅशटॅग्स

Shakti Pump Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x