19 May 2024 12:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
x

Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टीम शेअर अप्पर सर्किट हीट करतोय, सरकारच्या घोषणेने पुन्हा मल्टिबॅगर?

Servotech Share Price

Servotech Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. कारण नुकताच भारत सरकारने इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणाला मान्यता दिली आहे. या बामतीमुळे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग संबंधित पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली होती. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टीम कंपनीचे शेअर्स 1.49 टक्के वाढीसह 81.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( सर्वोटेक पॉवर सिस्टीम कंपनी अंश )

भारत सरकारने शुक्रवारी इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मंजुरी दिल्याची घोषणा केली होती. यामध्ये किमान 500 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 4,150 कोटी रुपये गुंतवणुकीसह देशात वाहन उत्पादन युनिट्स उभारणाऱ्या कंपन्यांना सवलत दिली जाणार आहे. हे ईव्ही धोरण भारताला ईव्ही उत्पादन हब म्हणून विकसित होण्यास अधिक प्रोत्साहन देईल. यामुळे टेस्लासह इतर जागतिक ईव्ही वाहन उत्पादक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित होतील.

या धोरणांतर्गत, ई-वाहनांचे उत्पादन युनिट स्थापन करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दराने सीमा शुल्कावर मर्यादित संख्येत कार आयात करण्याची मुभा दिली जाणार आहे. ही सवलत मिळवण्यासाठी वाहन निर्माता कंपनीला किमान 500 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 4,150 कोटी रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने माहिती दिली की, या नवीन ईव्ही धोरणामुळे भारतात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात वाढ होणार आहे. हे धोरण भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला अधिक प्रोत्साहन देईल. यामुळे EV कंपन्यांमधील निरोगी स्पर्धेला देखील प्रोत्साहन मिळेल. परिणामस्वरूप भारतातील EV इकोसिस्टीम मजबूत होऊन भारतातील ईव्ही वाहनाच्या उत्पादनामध्ये वाढ होईल. नवीन ईव्ही धोरण भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये देखील योगदान देईल.

या नवीन ईव्ही धोरणामुळे देशांतील वाहन उत्पादनाचा खर्च कमी होईल आणि आयात प्रमाण कमी होईल. ईव्ही वाहनाचा वापर वाढल्यास देशात केली जाणारी कच्च्या तेलाची आयात कमी होईल, आपला व्यापार तूट कमी होईल, आणि शहरांमधील वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे देशातील लोकांचे आरोग्य सुधारेल आणि पर्यावरणात देखील सकारात्मक बदल पाहायला मिळतील.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Servotech Share Price NSE Live 16 March 2024.

हॅशटॅग्स

Servotech Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x