19 May 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं Post Office Scheme | जबरदस्त फायद्याची पोस्ट ऑफिस योजना, रु.50 बचत करा, मिळतील 35 लाख रुपये Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील
x

Yes Bank Share Price | येस बँकबाबत मोठी सकारात्मक बातमी आली, नवीन अपडेटचा शेअरला किती फायदा होणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price| येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेने आता मायक्रोफायनान्स व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे निश्चित केले आहे. येस बँकेने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये मायक्रोफायनान्स व्यवसायात आगमन करण्याचे संकेत दिले आहे. ( येस बँक अंश )

सध्या येस बँक मायक्रोफायनान्स कंपनीचे अधिग्रहण करण्याचा पर्याय शोधत आहे. येस बँकेने मायक्रोफायनान्स व्यवसायात प्रवेश करण्यासाठी विविध पर्यायाची तपासणी केली आहे. यासाठी बँकेकडे काही पर्याय उपलब्ध आहेत. आज सोमवार दिनांक 18 मार्च 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.63 टक्के घसरणीसह 23.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

येस बँकेचे एमडी आणि सीईओ यांनी एका निवेदनात माहिती दिली की, “येस बँक आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मायक्रोफायनान्स संस्था अधिग्रहण करण्याचा आणि मायक्रोफायनान्स व्यवसायात प्रवेश करण्याचा पर्याय शोधत आहे. तथापि येस बँक आर्थिक वर्ष 2025 पासून या व्यवसायात उतरण्याचा विचार करत आहे”.

एमएसएमई विभागावर लक्ष केंद्रित करण्याबाबत बोलताना सीईओ म्हणाले की, येस बँकेच्या पोर्टफोलिओमध्ये लघु आणि मध्यम उद्योग कर्ज आणि मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट कर्जाचा वाटा 30 टक्के आहे. जो पुढील काही वर्षात 35 टक्के होऊ शकतो. येस बँकेचा एकूण NPA 2 टक्के आहे. बँकेच्या सीईओने दक्षिण भारतात देखील व्यवसाय विस्तार करण्याचे संकेत दिले आहेत. सध्या येस बँकेच्या हैदराबादमध्ये 25 शाखा काम करत आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर 1.5 टक्क्यांच्या वाढीसह 23.8 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा परतावा कोणत्याही बँकेतर्फे दिल्या जाणाऱ्या वार्षिक एफडी व्याज दरापेक्षा 10 पट अधिक आहे. मागील एका महिन्यात येस बँकेच्या शेअर्समध्ये जवळपास 18 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 18 March 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x