19 May 2024 11:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्र गुंतवणूकदारांची चांदी, लाभांश जाहीर, शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नुकताच आपले मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रने 45 टक्क्यांच्या वाढीसह 1,218 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. ( बँक ऑफ महाराष्ट्र अंश )

मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रने 840 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. शुक्रवार दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 3.83 टक्के वाढीसह 67.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

चालू आर्थिक वर्षात मार्च तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रने 6,488 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने 5,317 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. शुक्रवारच्या व्यवहारात बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 67.95 रुपये किमतीवर पोहचले होते. मार्च 2024 तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रचे व्याज उत्पन्न 5,467 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

मागील वर्षी मार्च 2023 तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रचे एकूण व्याज उत्पन्न 4,495 कोटी रुपये नोंदवले गेले होते. 31 मार्च 2024 पर्यंत बँक ऑफ महाराष्ट्रचा एनपीए कमी होऊन 1.88 टक्केवर आला आहे. मार्च 2023 च्या शेवटी या बँकेचा NPA 2.47 टक्के होता. बँकेचा शुद्ध एनपीए 2024 च्या शेवटी 0.25 टक्केवरून कमी होऊन 0.20 टक्के वर आला आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 1.40 रुपये प्रति शेयर लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bank of Maharashtra Share Price NSE Live 27 April 2024.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x