29 April 2024 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

उदयनराजेंचा सातारा येथे पराभव घडवून आणल्याचे सांगत..राऊतांच भाजपकडे बोट

MP Sanjay Raut, Chhatrapati Udayanraje Bhonsale

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज उदयनराजे यांना शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावेच घेऊन येण्याचे आव्हान दिले होते. हा वाद एवढ्यावरच थांबलेला नसून आता साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनीदेखील यामध्ये उडी घेतली आहे. शिवरायांच्या घराण्यात आम्ही जन्माला आलोय, हे जनतेला माहिती आहे. वेगळे पुरावे द्यायची गरज नसल्याचे सुनावतानाच त्यांनी हा वाद संजय राऊत यांनी सुरू केला आहे, त्यांनीच संपवावा असे आवाहन केले होते. यावर संजय राऊत यांचे नुकतेच ट्विट आले आहे.

मात्र खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एक ट्विट करत त्यांना प्रतिउत्तर दिलं आहे. यामध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. तसेच छत्रपतींच्याया प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती उदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायाच्या वंशजांचा अपमान आहे’, असे म्हणत त्यांनी भारतीय जनता पक्षाला या वादात ओढले आहे. या पराभवाबद्दल भाजपा शिवरायांच्या वंशजांची आणि महाराष्ट्राची माफी मागेला का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

काय आहे खासदार संजय राऊत यांचं नेमकं ट्विट;

तत्पूर्वी, उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राज्यात विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे, हेच संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून दिसत आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या विधानावर छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव असं शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच मी किंवा उदयनराजे, संभाजीराजे काही बोललो नव्हतो. संजय राऊत यांनीच वाद सुरू केला होता. त्यामुळे आता संजय राऊत यांनीच वाद संपवावा असेही शिवेंद्रराजेंनी सांगितले.

 

Web Title: Defeat Chhatrapati Udayanraje Bhonsale insult descendants Shivaji Maharaj MP Sanjay Raut blamed BJP.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)#Udayanraje Bhosale(54)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x