29 April 2024 6:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

९ तारखेच्या मोर्च्याच्या निमित्ताने मनसेच्या शहरनिहाय जोरदार बैठका

MNS Morcha, Pakistani Bangaladeshi, Raj Thackeray, Amit Raj Thackeray

मुंबई: पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात येत्या ९ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत एक विराट मोर्चा काढत आहे. त्या मोर्च्या तयारीच्या निमित्ताने पक्षाच्या नेत्यांमार्फत पदाधिकाऱ्यांच्या शहरनिहाय नियोजन बैठकांचं सत्र सुरु आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यात पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन ९ तारखेच्या कामाला लागले आहेत.

काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते लातूर येथे पक्षाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचा सांगता समारंभ पार पडला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले की मी तुमचा आज थोडासा भ्रमनिराश करणार आहे. कारण सर्दी, खोकला झाला आणि माझी तब्येत थोडी ढासळली, कारण मुंबईसारख्या भागात थोडीशी लागणच आहे. तब्येत खराब असल्यानं जास्त बोलताना मला प्रचंड त्रास होतो. आज देशात जे काही घुसखोर आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी ९ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने मी येथील सर्व उपस्थितांना मोर्चासाठी जाहीरपणे आमंत्रित करतो. त्यासाठी तुम्ही सर्वांनी तिथे येणे अत्यंत गरजेचं आहे. कारण ते तुमचं कर्तव्य देखील आहे. त्यादिवशी तिथे मोठं भाषण करावं लागणार असल्यानं माझा घसा ढणढणीत बरा करण्यासाठी जरा वेळ लागेल. मी एक तारखेला म्हणजे उदघाटनाला येऊ शकलो नाही, परंतु ९ तारखेला मुंबईत मोर्चा झाल्यानंतर माझा पहिला दौरा मराठवाड्यात आहे. त्यावेळी मराठवाड्यात आल्यानंतर आपणा सगळ्यांना निश्चित भेटेन आणि बोलेन, असं देखील राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची कास धरल्याने भारतीय जनता पक्षाला आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरेंची भेट घेऊन काही दिवस लोटत नाही तोच आता आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली होती.

आशिष शेलार बुधवारी सायंकाळी सात वाजता ‘कृष्णकुंज’वर दाखल झाले होते. सुमारे तासभर शेलार राज यांच्या निवासस्थानी होते. यादरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत मोर्चा काढत आहे. हा मोर्चा एकप्रकारे नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणाराच असून भारतीय जनता पक्षाचा अप्रत्यक्षपणे या मोर्चाला पाठिंबा राहणार आहे. त्याअनुशंगाने या दोन्ही नेत्यांत चर्चा झाल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. प्रसार माध्यमांना कोणतीही चुणूक लागू न देता भेट झाली होती.

तत्पूर्वी राज ठाकरे यांनी मुंबईतील कृष्णकुंज’वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि विभाग अध्यक्षांची महत्वाची बैठक पार पडली होती. त्यावेळी बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सर्वांच्या नजरेत धडकी भरवेल असा मोर्चा काढण्याच्या सूचना केल्याचं वृत्त होतं.

 

Web Title:  MNS organised city wise meeting for 9th February Mumbai Morcha.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x