28 April 2024 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार, दक्षिण भारतात प्लांट सुरु होणार

Apple Phone, Production in India, Corona Crisis

चेन्नई, २४ जुलै : जगभर प्रसिद्ध असलेल्या आयफोनने चिनमधील उत्पादन बंद करून भारतात उत्पादन सुरू केलं आहे. आयफोन ११ चे उत्पादन भारतात होणार असून देशात प्रथमच टॉप मॉडेल तयार करण्यात येत आहे. म्हणजे, अॅपलने चीनमधून गाशा गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

चैन्नई येथील फॉक्सकॉन येथे उत्पादन सुरू केले आहे. तसंच, टप्प्याटप्प्यो अॅपल भारतात व्यवसाय वाढवणार असल्याचंही सांगण्यात येतंय. भारतात तयार करण्यात आलेल्या या फोनची निर्यात देखील केली जाऊ शकते. अर्थात याबाबतचा निर्णय अद्याप घेतला गेला नाही. यामुळे अ‍ॅपलचे चीनवरील अवलंबत्व कमी होईल. यामुळे केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या मोहिमेलाही बळ मिळणार आहे.

भारतात उत्पादन होत असल्यामुळे अ‍ॅपलने आयफोन ११ च्या किंमती कमी केल्या नाहीत. कारण अद्याप अ‍ॅपल चीनमध्ये तयार करण्यात आलेले आयफोन भारतात विकत आहे. पण यापुढे आयफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. करण स्थानिक स्तरावर उत्पादन केल्यामुळे २२ टक्के इंपोर्ट ड्यूटी द्यावी लागणार नाही.

परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारनं जून महिन्यात ६.६ अब्ज डॉलर्सची विशेष योजना तयार केली होती. त्या अंतर्गत स्मार्टफोनचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना फायनॅन्शिअल इंसेटिव्ह्स देऊन भारतात गुंतवणुकीसाठी आकर्षित केलं जात आहे. Pegatron Corps आयफोनची दुसरी सर्वात मोठी असेंबलर आहे. या कंपनीचा अर्धा व्यवसाय हा अ‍ॅपलकडूनच मिळतो. यासाठी कंपनीनं चीनमध्ये अनेक प्रकल्प सुरू केले आहेत.

दुसरीकडे अ‍ॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती. चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा विचार आहे. भारतात १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना असून फॉक्सकॉन अ‍ॅपल कंपनीसाठी आयफोन असेंबल करण्याचे काम करते.

 

News English Summary: The world-famous iPhone has discontinued production in China and resumed production in India. The iPhone 11 will be manufactured in India and a top model is being made for the first time in the country. That is, Apple has begun the process of rolling out gas from China.

News English Title: First time apple making a top of the line model in India News Latest Updates.

हॅशटॅग्स

#ApplePhone(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x