3 May 2024 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक यांचं भुयारी गटार कलानगरकडे जातं - आ. नितेश राणे

MLA Nitesh Rane, CM Uddhav Thackeray, ED raid, MLA Pratap Sarnaik

मुंबई, २४ नोव्हेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर मनी लॉड्रिंग प्रकरणात ईडीनं छापेमारी सुरु केली आहे. सरनाईक यांच्या दोन्ही पुत्रांना ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या कारवाईवरुन शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तर शिवसेनेच्या आरोपांना भाजपकडूनही प्रत्युत्तर दिलं जात आहे. भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यानंतर आमदार नितेश राणे यांनीही सरनाईकांवर झालेल्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

“मुंबईत वायकर आणि ठाण्यात सरनाईक (Shivsena MLA Ravindra Waikar and MLA Pratap Sarnaik) यांचं भुयारी गटार कलानगरकडे जातं. ईडीचा तपास अजून खोलवर झाला तर बरोबर कलानगरमध्ये पोहोचतील. चुकीचं काही झालं असेल म्हणूनच ईडीने कारवाई केली आहे. प्रताप सरनाईक आणि रविंद्र वायकर हा एक मुखवटा झाला. त्याचा मागचा कलाकार जो आहे तो कलानगरमध्ये बसला आहे”, अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

दुसरीकडे माजी खासदार निलेश राणे (BJP leader and former MP Nilesh Rane) यांनी याच मुद्याला अनुसरून ठाण्यातील शिवसेनेला लक्ष केलं आहे. “ठाण्यातील शिवसेनेच्या राजकीय नेत्यांच्या उद्योगधंद्यांबद्दल मला बरीच माहिती आहे. ठाणे महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचे विद्यापीठ आहे. बिल्डिंग किंवा बांधकाम व्यवसायाशी निगडीत अनेक गैरव्यवहार ठाणे जिल्ह्यात आणि शहरात चालतात. ठाण्यातील शिवसेनेच सर्व नेते ज्या प्रकारचा कारभार करतात, त्यावरून ठाण्यात भ्रष्टाचार उघड आहे हे ठाणेकरांनाही माहिती आहे. बांधकाम व्यवसाय किंवा इतर अनेक गोष्टींमध्ये ठाण्याचे शिवसेनेचे आमदार, खासदार आणि मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. त्यांचे बरेच आर्थिक गैरव्यवहार आणि काळे धंदे आहेत”, असा दावा निलेश राणे यांनी TV9 Marathi शी बोलताना केला.

 

News English Summary: In Mumbai, Vaikar and in Thane, Sarnaik’s underground sewer goes to Kalanagar. If the ED investigates further, they will reach Kalanagar. The ED has taken action if something went wrong. Pratap Saranaik and Ravindra Vaikar became a mask. The artist behind it is sitting in Kalanagar, ”said MLA Nitesh Rane, attacking Chief Minister Uddhav Thackeray.

News English Title: MLA Nitesh Rane criticized CM Uddhav Thackeray indirectly after ED raid on MLA Pratap Sarnaik News updates.

हॅशटॅग्स

#Nitesh Rane(100)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x