29 April 2024 11:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

..त्यापेक्षा गाड्या OLX वर विका हा एकमेव पर्याय लोकांकडे असेल? | पेट्रोल-डिझेल ऐतिहासिक दरांकडे

Petrol Diesel

मुंबई, २५ जून | देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे दर ऐतिहासिक दरांकडे झेप घेत आहेत. त्यात मोदी सरकारला त्याच्याशी काहीच देणं घेणं नसल्याचं देखील पाहायला मिळतंय. ज्या मुद्यांना पुढे करत मोदी २०१४ मध्ये सत्तेत विराजमान झाले ते मुद्दे आज त्यांच्या चर्चतच नसतात. तसेच याच विषयामुळे महागाई प्रचंड वाढलेली असताना मोदी सरकारमध्ये यावरून काहीच हालचाल होताना दिसत नाही आणि परिणामी सामान्य माणूस होरपळून निघत आहे. त्यात सध्या तज्ज्ञांनी पेट्रोल-डिझेल संदर्भात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार तसं झाल्यास स्वतःची वाहन OLX वर विक्री करण्याशिवाय सामान्य लोकांकडे दुसरा पर्याय नसेल असंच दिसू लागलंय.

पेट्रोल-डिझेलच्या किमतींची घोडदौड सुरु आहे. पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालक मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे सरकार तेल कंपन्यांकडे बोट दाखवून, इंधन दर जागतिक क्रूड ऑईलवर ठरत असल्याचं सांगत आहे. इंधनाचे दर कधी कमी होणार, दर कमी होणार की नाही, असे प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारले जात आहेत. मात्र तज्ज्ञांच्या मते, इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता कमीच आहे.

क्रूड ऑईलचे दर वर्षभरात 26 डॉलर प्रती बॅरलने वाढले. जून 2020 मध्ये क्रूड ऑईलचे दर 40 डॉलर इतके होते. आता हे दर 76 डॉलरपर्यंत पोहोचले आहते. जगभरात कच्च्या तेलाच्या दराने टेन्शन वाढवलं आहे. आता सर्वांच्या नजरा 1 जुलैला होणाऱ्या OPEC+ देशांच्या बैठकीकडे लागल्या आहेत. यामध्ये उत्पादन धोरणावर निर्णय होणार आहे. रशिया क्रूड ऑईलचा पुरवठा वाढवण्याच्या बाजूने आहे.

125 रुपयांपर्यंत पेट्रोल दर पोहोचणार?
जर OPEC+ देशांच्या बैठकीत उत्पादन वाढवण्याचा निर्णय झाला, तर भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, भारतात लॉकडाऊनमुळे घटलेला महसूल, डॉलरच्या तुलनेत घसरणारा रुपया, याचा दबाव सरकारवर आहे. त्यातच सरकारने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारकडून इंधनाचे दर कमी केले जाण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सध्याच्या दरानुसार, डिसेंबरपर्यंत पेट्रोलचे दर प्रती लिटर 125 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Petrol Price Diesel rates no relief till this year prices may goes above 125 rupees news updates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x