18 May 2024 4:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

विरोधकांनी महागाई, इंधन दरवाढ, शेतकरी आंदोलनावरून प्रश्न विचारातच मोदींची लोकशाही, घटनेवरून ओरड सुरु

PM Narendra Modi

नवी दिल्ली, ०३ ऑगस्ट | राहुल गांधी यांची विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबतची नाश्ता बैठक संपली आहे. या बैठकीनंतर राहुल गांधी सायकलवरून संसदेसाठी रवाना झाले आहेत. महागाईवर विरोधी पक्ष सरकारला घेरण्याची तयारी करत आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लबची बैठक होताच काँग्रेस नेते संसदेकडे वळले. राहुलसोबत विरोधी पक्षांचे नेतेही सायकलवरून संसदेत जात आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी विरोधी पक्षांच्या नेत्यांना नाश्त्यासाठी बोलावले होते. ब्रेकफास्ट पॉलिटिक्सच्या मदतीने विरोधकांना एकत्र ठेवण्यासोबतच पेगासस हेरगिरी, महागाई, इंधन दरवाढ सारख्या मुद्यांवर संसदेत सरकारची घेराबंदीची रणनीती आखण्याचा हेतू होता.

दरम्यान, आज भाजपा खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. पेगासस, महागाई, इंधनदारवाढ, कोरोना स्थिती, शेतकरी आंदोलन तसंच अन्य मुद्द्यांवरुन विरोधकांकडून लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ घातला जात असून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यानंतर आज विरोधक संसदेचं कामकाज सुरळीत चालू देत नसल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. तसेच, विरोधकांकडून वारंवार संसेदचं कामकाज बंद पाडणं हा संसदेचा, घटनेचा, लोकशाहाची आणि लोकांचा अपमान आहे, असे म्हटले. संसदेच्या कामकाजावरुन विरोधकांवर टीका करण्याची ही मोदींची एका आठवड्यातील दुसरी वेळ आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Insult of parliament constitution democracy and people said PM Narendra Modi over oppositions stand against inflation fuel price news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x