2 May 2025 11:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

TRP Scam | रिपब्लिक'ला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सहा वेळा भेटून लाच

Republic TV Arnab Goswami, Partho Dasgupta, TRP manipulation, Mumbai police

मुंबई, ३० डिसेंबर: पार्थ दासगुप्ता हे ‘बार्क’मध्ये सीईओपदावर असताना टीआरपी मोजण्याचा डेटा आल्यावर त्यामध्ये फेरफार करून आणि त्यानंतरच तो जाहीर केला जाई. ‘रिपब्लिक’ वाहिनीला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी हा खटाटोप केला जात होता. डेटामध्ये फेरफार करण्यास ‘बार्क’मधील अनेकांचा विरोध असायचा; मात्र दासगुप्ता यांनी हाताशी घेतलेले काही जण यासाठी त्यांना मदत करायचे. हे नेमके अधिकारी कर्मचारी कोण आहेत, याबाबत चौकशी करण्यासाठी मंगळवारी दासगुप्ता यांना घेऊन पोलिसांनी ‘बार्क’चे कार्यालय गाठले. त्यांची संपत्ती तपासण्यासाठी बँक खात्यांचा तपशील, बँकेतील लॉकर तसेच इतर गुंतवणुकीबाबत पोलिसांनी चौकशी केली.

रिपब्लिक वाहिनीचे संस्थापक-संपादक अर्णव गोस्वामी यांनी सहा वेळा भेटून पैसे दिल्याचे दासगुप्ता यांनी म्हटले आहे. यातील तीन वेळा मुंबईतील वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये झालेल्या भेटीचा तपशील त्यांनी पोलिसांना दिला आहे. या ठिकाणी झालेल्या आर्थिक व्यवहाराचे पुरावेदेखील पोलिसांच्या हाती लागल्याने अर्णव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘रिपब्लिक’कडून हॉलिडे पॅकेज; तसेच रोख मोबदला दासगुप्ता यांना मिळाला असून, यातून त्यांनी कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे.

मुंबई येथील मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी दासगुप्ताला २८ डिसेंबर, २०२० पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती, नंतर ती ३० डिसेंबर, २०२० पर्यंत वाढविण्यात आली. पार्थो दासगुप्ता यांना मुंबई पोलिसांनी गेल्याच आठवड्यात अटक केली असून त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळ्यात पहिल्यांदाच अर्णव गोस्वामी यांचं नाव थेट कोर्टात उघडपणे घेतलं आहे. दरम्यान, गोस्वामी यांच्याकडून याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, पार्थो दासगुप्ता यांनी रिपब्लिककडून मिळालेल्या पैशातून दागदागिने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या आहेत. या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये १ लाख रुपये किमतीचं घड्याळ आणि इमिटेशन ज्वेलरीसह २.२२ लाख किमतीचे काही मौल्यवान खड्यांचा समावेश आहे.

 

News English Summary: Dasgupta has said that Arnav Goswami, the founder-editor of Republic Channel, met him six times and paid him. He has given the details of his three visits to different hotels in Mumbai to the police. Arnav’s troubles are likely to escalate as the police also find evidence of financial transactions at the place. Holiday package from ‘Republic’; Dasgupta has also received cash compensation, from which he is suspected to have bought property worth crores.

News English Title: Republic TV Arnab Goswami conspired Partho Dasgupta TRP manipulation Mumbai police news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या