15 December 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

आधार कार्डला पॅन लिंक केलात का? | डेडलाईन जवळ | अन्यथा 10 हजाराचा दंड

Link PAN Card, Aadhaar Card, Penalty for delay

मुंबई, १२ डिसेंबर: PAN Card म्हणजे कायमस्वरूपी खातं क्रमांक म्हणजेच स्थायी खाते क्रमांक. सध्याच्या सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवयायामध्ये पॅनकार्ड महत्त्वाचं असतं. मग ते एखाद्या बँकेत खातं उघडण्याचं काम असो किंवा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत पॅनकार्ड सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. PAN नंबरद्वारे केलेले आर्थिक व्यवहार वैध मानले जातात. अनेक यामुळे मोठी फसवणूकही टाळता येते. पॅनकार्डच्या वापरामुळे भविष्यात कायदेशीर अडचणीत येण्याची शक्यता कमी असते. पण या सगळ्यात पॅनकार्ड (PAN Card) आधार कार्डशी जोडलेलं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचंही पॅनकार्ड आधार कार्डशी (Aadhar Card) जोडलेलं आहे का?. Is your PAN card also linked to Aadhar Card?

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार पॅनकार्ड आधारशी जोडणं (Instruction of Union Government Pan card link to Aadhaar Card) बंधनकारक असणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या कामासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर शेवटच्या तारखेपर्यंत कार्ड लिंक झालं नाही तर तुम्हाला 10,000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. यामुळे तुम्हीही जर पॅनकार्ड आधारशी लिंक केलं नसेल तर तातडीने ती प्रक्रिया पूर्ण करा.

पॅनकार्ड होऊ शकतं बाद किंवा आकारला जाऊ शकतो दंड:

पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं. If you use any expired PAN card after 31st March 2021, a penalty of Rs.10,000 is levied under Section 272B of the Income Tax Act.

पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

  • आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.
  • इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.
  • यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.
  • सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

 

News English Summary: As per the instructions given by the Central Government, it will be mandatory to link PAN card to Aadhaar Card. As per the notification issued by the Union Finance Ministry, the deadline for this work is March 31, 2021. If the card is not linked by the deadline, you may be fined Rs 10,000. So if you have not linked to PAN card support, complete the process immediately.

News English Title: Link PAN Card to Aadhaar Card before 31 March 2021 else pay penalty news updates.

हॅशटॅग्स

#Aadhar Card(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x