15 December 2024 10:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Lava Blaze 5G | लावा ब्लेझ 5G स्मार्टफोनची विक्री 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार, किंमत 10 हजारांपेक्षा कमी विथ टॉप फीचर्स

Lava Blaze 5G Smartphone

Lava Blaze 5G | भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी लावाचा नवा ब्लेझ 5 जी स्मार्टफोन 15 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन इंडियावर खरेदी करता येणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे, परंतु सेलच्या दिवशी ग्राहक 9,999 रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत खरेदी करू शकतात. लावा ब्लेझ 5 जी स्मार्टफोन ब्लू आणि ग्रीन अशा दोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार असून ग्लास-बॅक डिझाइनसह येणार आहे.

स्पेसिफिकेशन्स
१. लावा ब्लेझ 5 जी फोनमध्ये एचडी + आयपीएस स्क्रीनसह 6.5 इंचाचा डिस्प्ले असून 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. यात वाइडवाईन एल १ सपोर्टचाही समावेश आहे.
२. यात मीडियाटेक डायमेन्शन ७०० चिप मिळते, जी ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह पेअर केली आहे. हे सॉफ्टवेअर अँड्रॉइड १२ वर आधारित असून कॉल रेकॉर्डिंग हे इन-बिल्ट फीचर आहे.
३. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर सोबत मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फ्रंटला ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये पॉवर देणारी ५,००० एमएएचची बॅटरी आहे.
४. स्मार्टफोनमध्ये स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट, चार्जिंग आणि डेटा ट्रान्सफरसाठी यूएसबी-सी पोर्ट, वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ 5.1, ड्युअल सिम सपोर्ट, फेस अनलॉक आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सारखे फीचर्स आहेत.

बॅकग्राउंडमध्ये चालणार यूट्यूब
याशिवाय स्मार्टफोनमध्ये बॅकग्राऊंडमध्ये युट्यूब चालू शकणार असून त्यामुळे युजर्सना एकाच वेळी स्मार्टफोनवर स्वतंत्रपणे काम करता येणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. लाँचिंगवेळी कंपनीने आपल्या ग्राहकांना विक्रीनंतरची सेवा म्हणून ‘फ्री सर्व्हिस अॅट होम’ देण्याची घोषणा केली होती. वॉरंटी कालावधीत या सुविधेचा लाभ घेता येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Lava Blaze 5G smartphone sale will be start from 15 November on Amazon India check price details on 11 November 2022.

हॅशटॅग्स

#Lava Blaze 5G Smartphone(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x