3 May 2025 2:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Health First | या घरगुती उपायांनी कमी करा चेहऱ्यावरील सुरकुत्या | दिसा तरुण - नक्की वाचा

Home remedies on face wrinkles

मुंबई, ०४ जुलै | एका ठराविक वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसायला लागतात. सुरकुत्यामुळे चेहऱ्याची सुंदरता बिघडते. तसेच आत्मविश्वासही कमी होतो. आज आपण चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपायांची माहिती या लेखामधुन घेउयात. लिंबू आणि संत्री सारख्या लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई भरपूर असतात, म्हणून ते त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.

* लिंबूवर्गीय फळ त्वचा तरुण आणि सुंदर बनविण्यात मदत करतात. लिंबूवर्गीय फळांमध्ये आढळणारे फ्लाव्होनॉइड त्वचेमध्ये कोलेजेन आणि इलेस्टिन राखून ठेवण्यास मदत करतात. म्हणून आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा.
* चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चेहऱ्यावर चंदन लेप लावा. चंदन लेप लावल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होण्यास मदत मिळेल. यातील अन्टीबॅक्टेरीयल तत्त्व चेहऱ्यावर परिणाम करणाऱ्या बॅक्टेरीया नष्ट करून चेहरा उजळ बनवतात.
* चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी पपईचा गर आणि केळं मिक्सरमध्ये वाटून घ्या.वाटलेले मिश्रण तुमच्या सुरकुतलेल्या त्वचेवर लावा. १० मिनीटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या .पपईमध्ये चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करणारे गुणधर्म असतात.
* चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी लिंबू पाण्यानेचेहरा धुवून घ्या. लिंबू पाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावरील मृत पेशी तसेच सर्व प्रकारचे डाग नाहीसे होऊन चेहरा नितळ होण्यास मदत मिळते. यातील अॅसिडने चेहऱ्यावरील ऑईल बॅलेन्स करते.
* चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी ५ बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवा.सकाळी साले काढून दुधासोबत बदाम मिक्सरमध्ये वाटून घ्या.चेहऱ्यावर हे मिश्रण लावा.
* २० मिनीट चेहरा तसाच राहुद्या नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून काढा.बदामामुळे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. आणि तुमची त्वचा पुन्हा सतेज व उजळ दिसू लागेल.
* चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि त्वचा निरोगी, मऊ आणि तरुण राहण्यासाठी आपण चांगल्या गोष्टी खा. आणि शक्य तितके पाणी प्यावे. याशिवाय पुरेशी झोप घ्या आणि तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Home remedies on get rid of wrinkles on face news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या