2 May 2025 9:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

लसीकरणाची नवी गाइडलाइन आली | भारतात जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची शक्यता

Union government, New SOP, Covid 19 vaccination, guidelines

मुंबई, १३ डिसेंबर: देशात लसीकरणाची (Corona Covid-19 Vaccination) जोरात तयारी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रत्येक सत्रात फक्त १०० लोकांना लशीचा डोस दिला जाणार आहे. लशीची उपलब्धता आणि तयारी उत्तम झाली तर ही संख्या २०० पर्यंत पोहोचू शकणार आहे. नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अॅडमिनीस्ट्रेशनने (NEGVAC) यासाठी तपशीलवार गाइडलाइन तयार केली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे एक विशेष पथक या ११२ पानी गाइडलाइनची समीक्षा करणार (A special team from the Union Ministry of Health will review the 112-page guideline) आहे. या गाइडलाइननुसार, देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आपापल्या प्रदेशातील लसीकरणाचा दिवस ठरवणार आहेत. केंद्र सरकारने पुढील ६ ते ८ महिन्यांमध्ये देशातील ३० कोटी लोकांना लस टोचण्याची तयारी केली आहे. यासाठी औषध निर्मिती कंपन्यांकडून ६० कोटी डोस खरेदी केले जाणार आहेत.

दरम्यान, भारतात जानेवारीपासून कोरोना लसीच्या लसीकरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लसीकरणासंदर्भात सीरम इन्स्टिट्युटच्या अदर पुनावाला यांच्याकडून संकेत देण्यात आले आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत सीरमच्या कोरोनावरील लसीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे, असं अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना अदर पुनावाला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मात्र, या लसीच्या वापरासाठी परवानगी नंतर मिळू शकते. यावेळी बोलताना त्यांनी, जानेवारी, 2021 मध्ये देशात कोरोना लसीच्या लसीकरणाच्या अभियानाला सुरुवात होऊ शकते, असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.

दर पुनावाला यांनी सांगितलं की, त्यांची कंपनी केंद्र सरकारसोबत खासगी बाजारासाठी कोरोना लसीचे डोस तयार करीत आहे. केंद्र सरकारचा पुढच्या वर्षी जुलैपर्यंत लसीचे 30 ते 40 कोटी डोस खरेदी करण्याचा मानस आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची 20 ते 30 टक्के लोकसंख्येला कोरोनाच्या लसीचा डोस देण्याची योजना आहे. त्यांनी शक्यता वर्तवली आहे की, पुढच्या वर्षी ऑक्टोबरपर्यंत देशातील एकूण लोकसंख्येपैकी एका मोठ्या वर्गाला कोरोना लसीचा डोस देण्यात येईल.

 

News English Summary: Preparations for Corona Covid-19 Vaccination are in full swing in the country. Initially, only 100 people will be vaccinated in each session. If the availability and preparation of the vaccine is good, this number can reach 200. The National Expert Group on Vaccine Administration (NEGVAC) has developed detailed guidelines for this.

News English Title: Union government issues new SOP for Covid 19 vaccination guidelines News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या