महत्वाच्या बातम्या
-
भाजप महिला नेत्या रिदा रशीद यांनी विधवा महिलेला नोकरीच्या मोबदल्यात वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलं, गंभीर गुन्हा दाखल
Rida Rashid BJP | भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष रिदा रशीद यांच्याविरोधात वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिदा रशीद यांनी काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. रिदा रशीद यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत. या त्याच भाजप महिला नेत्या आहेत ज्यांनी जितेंद्र आव्हाडांवर विनयभंग केल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
1 महिन्यांपूर्वी -
Bharat Jodo Yatra | 3000 किमी चालत दिल्लीला पोहोचली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा, प्रचंड थंडीतही लोकांची प्रचंड गर्दी
Bharat Jodo Yatra | काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ देशातील नऊ राज्यातून पार करत आज राजधानी दिल्लीत पोहोचली. विशेष म्हणजे या काळात राहुल गांधी ३००० किलोमीटरहून अधिक अंतर चालत दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. या प्रचारात राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी आणि बहीण प्रियांका गांधीही त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. “ते द्वेष पसरवतात, आमच्यात प्रेम आहे, आम्ही सर्व भारतीयांना जवळ घेतो आणि त्यांना मायेने आलिंगन देतो,” असं राहुल गांधी दिल्लीत पोहोचल्यानंतर म्हणाले. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली भारत जोडो यात्रा जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला जाणार आहे.
1 महिन्यांपूर्वी -
Indian Economy | भारताची आर्थिक वाढ अत्यंत बिकट स्थितीत, गरजेनुसार विकास नोंदवू शकणार नाही - RBI एमपीसी सदस्य
Indian Economy | भारताचा आर्थिक विकास सध्या ‘अत्यंत नाजूक’ स्थितीत असून त्याला पूर्ण पाठिंबा हवा आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीचे (एमपीसी) सदस्य जयंत आर. वर्मा यांनी ही माहिती दिली आहे. खासगी उपभोग आणि भांडवली गुंतवणुकीने अद्याप वेग घेतलेला नाही, त्यामुळे अर्थव्यवस्थेची आर्थिक वाढ कमकुवतच आहे, असे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. भारताची अर्थव्यवस्था आपल्या आकांक्षा आणि गरजेनुसार विकास नोंदवू शकणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
1 महिन्यांपूर्वी -
दिशा सालियनच्या आई-वडिलांना माध्यमांना भेटण्यास बंदी, सुरक्षा वाढवली, टोकाचं पाऊल उचलल्यास शिंदे-फडणवीसांना भोवणार?
BIG BREAKING | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आज सत्तांधाऱ्यांनी अनके प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दिशा सालियनच्या कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आलीय. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावर आज विधानसभेत मुद्दा आला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांना प्रसारमाध्यमांना भेटण्यास बंदी घालण्यात आली आहे. कारण, आम्हालाही आत्महत्या करावीशी वाटतेय असं सांगताना, जर हे थांबलं नाही तर आम्हीही टोकाचं पाऊल उचलू. यासाठी राजकारणीच जबाबदार असतील असं दिशाच्या आईनं यापूर्वीच प्रसार माध्यमांसमोर सांगितलं होतं.
1 महिन्यांपूर्वी -
राष्ट्रावादीचे विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन, विरोधक आक्रमक
Maharashtra Assembly Winter Session | राष्ट्रावादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा गटनेते जयंत पाटील यांचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि आवाजी मतदानाने तो मंजूर करण्यात आला. जयंत पाटील यांनी वापरलेल्या शब्दांमधून सभागृहाचा आणि अध्यक्षांचा अवमान झाला असल्याचं निरीक्षण अध्यक्ष नार्वेकर यांनी नोंदवलं.
1 महिन्यांपूर्वी -
BMC इलेक्शन फिल्डिंग | मुख्यमंत्री शिंदे भ्रष्टाचार आरोपाच्या कचाट्यात अडकताच तुम्ही चौकशीची मागणी करा, मी चौकशी लावतो हे ठरलेलं?
Disha Salian Case | भाजप आमदार अमित साटम यांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर इतर सदस्यांनी साटम यांची ही मागणी उचलून धरली. भाजपच्या महिला आमदारांनीही या प्रकरणाचं सत्य बाहेर आलंच पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदस्यांची ही मागणी मान्य करत हे प्रकरण एसआयटीकडे सोपवत असल्याचं जाहीर केलं. दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी केली जाईल. ज्यांच्याकडे या प्रकरणाचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांना द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मात्र सत्ताधाऱ्यांच्या बैठकीत हे सर्व आधीच ठरलं होतं असा आरोप करण्यात येतं आहे.
1 महिन्यांपूर्वी -
'A फॉर'? सगळ्या विकृतींचं नाव एकच! नितेश राणेंना म्हणायचंय तरी काय? कारण योगी आदित्यनाथ, अमित शहा??
BJP MLA Nitesh Rane | नागपूर विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “आपण सगळ्यांनी विचार करायला हवा की, महाराष्ट्रात इतके राजकारणी आहेत, पण जेव्हा जेव्हा सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियनचा प्रश्न येतो. मुद्दा काढला जातो, तेव्हा फक्त आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं जातं? तेव्हा दुसऱ्या राजकारण्याचं नाव का घेतलं जात नाही? का उल्लेख केला जात नाही. दुसरे राजकारणी महाराष्ट्रात नाहीये का? कुठे न कुठे दाल में कुछ काला हे म्हणून तर एकाच माणसाचं सातत्यानं नाव घेतलं जातं.
1 महिन्यांपूर्वी -
ज्यांची स्वतःच्या घरातही निष्ठा नाही अशा लोकांबद्दल आणि त्या घाणीत मला पडायचं नाही, आदित्य ठाकरेंनी मोजक्या शब्दात लायकी दाखवली
Aaditya Thackeray | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आरोप केल्यानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय.
1 महिन्यांपूर्वी -
मुख्यमंत्री शिंदेंवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच शिंदे गटातील खासदाराचे लोकसभेत हास्यास्पद दावे? संसदेत राजकीय स्टंटबाजी प्रश्न?
Shinde Camp MP Rahul Shewale | अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्यावर हास्यास्पद प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यांचा नावाचा उल्लेखच शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. लोकसभेत आज ड्रग विधेयकाच्या चर्चेदरम्यान खासदार राहुल शेवाळे यांनी बाजू मांडली. यावेळी राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य – उद्धव यांचे नाव घेतले आहे.
1 महिन्यांपूर्वी -
महाराष्ट्राला एक इंच जमीन देणार नाही, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं, शिंदेंचा आवाज फक्त शिवसेनेविरोधात वाढतो?
CM Basavaraj Bommai Statement | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न राज्याच्या हिवाळी अधिवेशनात गाजत असतानाच कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा या प्रकरणावर भाष्य केलंय. महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असं म्हणत बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं असून, कर्नाटक विधानसभेत त्यांनी ही भूमिका मांडलीये. त्यामुळे सीमावादाच्या प्रश्नाचा पुन्हा भडका उडणार असंच दिसतंय.
1 महिन्यांपूर्वी -
ठाकरेच उजवे! मुख्यमंत्री पद, कॅबिनेट मंत्रिपदांसह 40 आमदार-12 खासदार व 10 अपक्ष आमदार असूनही शिंदेंना 801 जागा तर ठाकरेंना 705
Maharashtra Grampanchayat Election Result | राज्यातील 7,682 ग्रामपंचायंतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. यामध्ये 65,916 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी 14, 028 सदस्य बिनविरोध विजयी झाले होते. तर सरपंचपदांच्या 7,619 जागांवर निवडणूक झाली. यात 699 सपंच बिनविरोध विजयी झाले. तर 63 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज आला नाही. राज्यभरातील आकडेवारी पाहता भाजपशिंदे युतीनेने सर्वाधिक जागांचा दावा केला असला तरी वास्तविक महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्याचे आकडेवारी सांगते आहे.
1 महिन्यांपूर्वी -
श्रद्धा वालकर प्रकरणी तपासात कोणताही राजकीय दबाव आढळला नाही, फडणवीसांच्या उत्तराने भाजप आमदार तोंडघशी
Shraddha Walker Case | हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असतानाच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची लक्षवेधी मांडून या प्रकरणाकडे आता साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण श्रद्धा वालकरची नोव्हेंबर महिन्यात झालेली हत्या आणि त्यानंतर ते प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केले आहेत.
1 महिन्यांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुकीत आतापर्यंत महाविकास आघाडी सरस, 3235 ग्रामपंचायतींवर विजय, तर भाजप-शिंदे गटाच्या युतीला 3153 जागा
Gram Panchayat Election Results | राज्यात आज 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये ताजी अपडेट्स येईपर्यंत भाजपने एकूण 2102 ग्रामपंचायतींवर विजयी पताका फडकवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर राष्ट्रवादीने 1448 ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवलं आहे. शिंदे गटाने ठाकरे गटापेक्षा जास्त ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. एकूण ७७५१ जागांपैकी 7669 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यानुसार महाविकास आघाडी 3235 ग्रामपंचायती जिंकत सरस ठरली आहे, तर युतीला एकूण 3153 जागा मिळाल्या आहेत. राज्यातील ग्रामपंचायती निवडणुकीसाठी रविवारी मतदान झालं होतं, आज त्याचा निकाल जाहीर झाला.
1 महिन्यांपूर्वी -
मुख्यमंत्री शिंदेंवर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप, न्यायालय हस्तक्षेप झाल्याचं सांगतं तेव्हा ही बाब गंभीर - उद्धव ठाकरे
CM Shinde Accused of Plot Scam | हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंडावरुन झालेल्या आरोपामुळे चांगलाच गदारोळ माजला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरविकासमंत्री असताना 83 कोटींचा भूखंड 2 कोटी रुपयांना विकल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानसभेतून सभात्याग केला. तर, उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली.
1 महिन्यांपूर्वी -
मुख्यमंत्री शिंदेंवर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप, 86 खोक्यांचा भुखंड फक्त 2 खोक्यांना दिल्याचा आरोप
CM Shinde Accused of Plot Scam | हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी जोरदार आघाडी घेतली. पहिल्या दिवशी महाविकास आघाडी बॅकफूटवर असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर आता विधान परिषदेत महाविकास आघाडी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निशाण्यावर घेतलं. त्यावेळी विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार पाठराखण करत विरोधकांनी उत्तर दिले आहे.
1 महिन्यांपूर्वी -
खरंच दिग्गज नेते की कृत्रिम राजकीय फुगवटा? सी आर पाटील गुजरातमध्ये हिरो आणि ग्राम पंचायत निवडणुकीत झिरो, पॅनल पराभूत
BJP CR Patil | महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या निकालाची उत्सुकता राजकीय पक्षांसह जनतेलाही होती. प्रतिक्षा संपली असून, मतमोजणी सुरू झालीये. तब्बल 7 हजार 135 ग्रामंपचायतींसाठी मतदान झालं होतं. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये कुणाला गुलाल उधळण्याची संधी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यांना लागली आहे.
1 महिन्यांपूर्वी -
कांग्रेस है तो ही मुमकिन है? | राजस्थानमध्ये मोदी सरकार देत असलेला उज्ज्वला योजनेतील 1040 रुपयांचा सिलिंडर 500 रुपयात
LPG Cylinder in Rs 500 | राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यातील गरीब कुटुंबांना केवळ ५०० रुपयांत एलपीजी सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे. दारिद्र्य रेषेखालील आणि ज्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी कनेक्शन देण्यात आले आहे, अशा कुटुंबांसाठी गेहलोत यांनी ही घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2023 पासून आपली नवी योजना लागू करण्यात येणार असून त्यासाठी पुढील महिन्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राजस्थानमधील अलवरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विराट सभेत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही मोठी घोषणा केली.
1 महिन्यांपूर्वी -
Viral Video | कोकणी लोकांनाही शिंदेंची कंटाळवाणी भाषण शैली आवडेना, सभेकडे पाठ, सभेत खाली खुर्च्यांची ऐतिहासिक गर्दी
CM Eknath Shinde Flop Rally at Ratnagiri | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा १६ डिसेंबर पासून कोकण दौरा सुरु झाला होता. महाराष्ट्रातील ऐतिहासिक बंडानंतर एकनाथ शिंदे यांचा पहिलाच कोकण दौरा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध विकासकामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार होते आणि तसे कार्यक्रमही पार पडले. दरम्यान, रत्नागिरीच्या प्रमोद महाजन संकुलात एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
1 महिन्यांपूर्वी -
पाकिस्तानी मंत्र्याच्या विरोधात भाजपच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्याने लहान मुलाचं लिंग धरुन ओढल्याचा घृणास्पद प्रकार
BJP Maharashtra Protest | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुट्टो यांच्याविरोधात भाजपने आज शनिवारी विविध जिल्ह्यात आंदोलन केले. भारतीय जनता पक्षाकडून बिलावल भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मार करून त्याचे दहण करण्यात आले भाजपकडून पुणे, नांदेड, जालना, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती या ठिकाणी ही आंदोलन करण्यात आली.
1 महिन्यांपूर्वी -
महाविकास आघाडीच्या विराट महामोर्चाला जनसागर लोटला, प्रचंड संख्येने कार्यकर्ते आणि सामान्य लोकांचाही सहभाग
MVA Mahamorcha in Mumbai | महाविकास आघाडीच्या वतीने आज (17 डिसेंबर) मुंबईत विराट महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये राज्यपाल हटाव आणि भाजपच्या मंत्र्यांची महापुरुषांबाबतची वादग्रस्त वक्तव्यं या सगळ्याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. या महामोर्चाला मोठा जनसागर लोटला होता.
1 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Olatech Solutions Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 5 महिन्यांत 300% पेक्षा अधिक परतावा दिला, स्टॉक खरेदी करावा का?
-
IndusInd Bank Share Price | बँकिंग शेअर, तिमाही निकालानंतर स्टॉकवर तज्ज्ञांकडून नवी टार्गेट प्राईस, डिटेल्स पहा
-
Deep Diamond India Share Price | 1 वर्षात 842% परतावा देणाऱ्या कंपनीने जाहीर केले स्टॉक स्प्लिट, स्टॉक स्प्लिटचा फायदा घेणार?
-
Lotus Chocolate Company Share Price | या शेअर सोबत मुकेश अंबानींचं नावं जोडलं गेलं, 1 महिन्यात 122% परतावा, स्टॉक डिटेल्स
-
GCM Capital Advisors Share Price | अबब! फक्त 5 रुपयाचा पेनी शेअर, दर दिवशी 20% परतावा, खरेदी करावा?
-
Anant Raj Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओमधील जबरदस्त शेअर, 7 महिन्यांत 180% परतावा दिला, खरेदी करणार?
-
Richest Report | सर्वात श्रीमंत 1% भारतीयांकडे देशातील 40% पेक्षा जास्त संपत्ती, अर्ध्या लोकसंख्येकडे फक्त 3% संपत्ती
-
Lotus Chocolate Company Share Price | विस्तार मुकेश अंबानींच्या उद्योगाचा, लॉटरी लागली चॉकलेट कंपनीच्या शेअरची, पैसा 3 पट
-
Ducol Organics and Colours Share Price | जबरदस्त IPO! शेअरची शानदार एंट्री, लिस्टिंगला 43% परतावा, आज 5% वाढला
-
2023 Hyundai Grand i10 Nios Facelift | 2023 हुंडई ग्रांड i10 निओस फेसलिफ्ट लॉन्च, किंमत 5.69 लाख रुपये