महत्वाच्या बातम्या
-
VIDEO | शिंदे सर्मथक आ. संतोष बांगर यांच्यावर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा फिल्डिंग लावून हल्ला, बांगर सुसाट पळाले
MLA Santosh Bangar | हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे संतोष बांगर आले होते. यावेळी काही संतप्त शिवसैनिकांनी संतोष बांगर यांची गाडी अडवली.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे पिता-पुत्राचे फोटो हटवले म्हणून महिला शिवसैनिकावर लगेच देशद्रोहाचा गुन्हा | पण PFI आंदोलकांवर इतका उशीर का?
PFI Protest Pakistan Zindabad Slogans | पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी आरोपींविरोधातली कलमं वाढवली आहेत. युवासेना (शिवसेना), मनसे आणि भाजपने या आरोपींवर देशद्रोहाची कलमं लावण्याची मागणी केली होती. काल पुणे तळेगाव येथील मोर्चात देखील आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना यावर लगेच कारवाई होणं अपेक्षित असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे युवासेना देखील पुण्यात आंदोलनात उतरली होती आणि पोलिसांवर सर्वच बाजूने राजकीय दबाव वाढला होता. मात्र एवढं घडूनही शिंदे सरकारने इतका उशीर का केला याची चर्चा रंगली आहे.
3 वर्षांपूर्वी -
2024 मध्ये भाजपचा पराभव निश्चित | एनडीए शिल्लक राहिली नाही, पण शंख रॅलीत विरोधक एकवटले - नितीश कुमार
Opposition Unity | इंडियन नॅशनल लोकदलातर्फे (आयएनएलडी) रविवारी हरियाणातील फतेहाबादमध्ये विरोधकांची शंख रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेते सहभागी झाले होते. विरोधकांचा हा मेळावाही महत्त्वाचा मानला जात आहे, कारण बिहारमध्ये एनडीएपासून फारकत घेतल्यानंतर नितीश कुमार पहिल्यांदाच विरोधकांच्या मोठ्या व्यासपीठावर दिसले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | हत्ती चारचाकी कारला अक्षरशः खेळणं समजून खेळत होता, आजूबाजूच्या लोकांची बोंबाबोंब, व्हायरल व्हिडीओ पहा
Viral Video | बहुदा लोकांना हत्तीचे पिल्लू खूप आवडते. लोक इंटरनेटवर सतत प्राण्यांचे व्हिडिओ पाहत असतात. दरम्यान, अनेकदा सोशल मीडियावर हत्तीचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, एक हत्ती चार चाकी गाडी गोल गोल फिरवत आहे. अगदी खेळण्यातली गाडी असावी आणि लहान मुलाने ती खेळत बसावी. दरम्यान, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकुळ घालत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | मुलगी अचानक आधाराशिवाय हवेत तरंगू लागली, अमेरिकेत नेमकं चाललंय काय?, व्हिडिओ प्रचंड व्हायरल
Viral Video | तुम्ही कधी असा विचार केला आहे का, अचानक तुमच्या समोर कोणी आकाशात उडायला लागले, ना त्याने पॅराशुट बांधले आहे ना आणि काही मात्र तो आकाशात उडायला लागला. तेव्हा ते किती भितीदायक असेल. असाचं एक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये एक मुलगी हवेमध्ये तरंगत आहे. हा व्हायरल व्हिडिओ अमेरिकेमधील असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे लोक हॅलोविनच्या तयारीत व्यस्त आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे हॅलोविन म्हणजे नेमके काय? भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये जसा पितृपक्ष पाळून पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे तसेच अमेरिकेमध्ये व सर्वत्र ख्रिस्ती बांधव हॅलोवीन साजरा करतात. दरवर्षी 31 ऑक्टोबर दिवशी हॅलोविन (Halloween) सन साजरा केला जातो. तर दुसरीकडे हा असा प्रकार उघडकीस आला आहे. तर चला जाणून घेऊ मुलगी हवेत तरंगली कशी?
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील तरुणांचा रोजगाराचा मुद्दा गंभीर होऊ लागताच शिंदे गटाकडून धामिर्क मुद्द्यांवर भर, 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा रोजगार निर्माण करणार?
Hindu Garva Garjana | देशात सामान्य लोंकांसाठी महागाई आणि बेरोजगारीचे मुद्दे महत्वाचे झाले आहेत. दुसरीकडे, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येताच वेंदांता सारखा १ लाख लोकांना रोजगार देऊ शकेल असा प्रकल्प तडकाफडकी गुजरातला गेल्याने तरुणांमध्ये शिंदे-फडणवीस सरकार विरोधात प्रचंड नाराजी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली
Ankita Bhandari Murder | उत्तराखंडच्या ऋषिकेश जिल्ह्यातील कालव्यातून शनिवारी १९ वर्षीय अंकिता भंडारी हिचा मृतदेह सापडला. काही तासांनंतर अंकिता ज्या रिसॉर्टमध्ये काम करत होती, त्या रिसॉर्टला जमावाने आग लावली. अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी उत्तराखंडचे माजी मंत्री आणि भाजप नेते विनोद आर्य यांचा धाकटा मुलगा पुलकित आर्य याचे हे रिसॉर्ट आहे. या घटनेनंतर भाजपनं विनोद आर्य यांना पक्षातून निलंबित केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा
CM Eknath Shinde | राज्यात शिंदे सरकार आल्यापासून एकावर एक धक्कादायक घटना घडत आहेत. एकाबाजूला रोजगारावरून तरुणांमध्ये असंतोष वाढत असताना दुसरीकडे राज्यात पाकिस्तानचा जयजयकार करणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत. पीएफआयच्या देशभरातील कार्यालयांवर एनआयए आणि ईडीने धाडी टाकल्या. या प्रकरणात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतून कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलेली असून, या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळचे काही व्हिडीओ समोर आले असून, या व्हिडीओच्या आधारे आंदोलकांकडून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यावर, पोलिसांकडून अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही. दरम्यान, या प्रकारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करत प्रतिक्रिया दिलीये. ‘शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत’, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत
Shivsena | युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे आदित्य ठाकरेंनी तळेगावात आपल्या भाषणात प्रचंड आक्रोश केला. राज्याचा खरा मुख्यमंत्री नेमका कोण आहे हेच राज्याला अजून समजलेलं नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारला खोके सरकार संबोधताच उपस्थितांनी मोठा प्रतिसाद दिला.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | भाजीविक्रेत्याचे घृणास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद, भाजीपाला स्वच्छ करण्यासाठी लघुशंका केली, व्हिडिओ व्हायरल
Video Viral | अनेकदा आपण ऐकले असेल की, बाहेरील उघड्यावरील खाद्य पदार्थ कश्या ही हातांनी किंवा कोणत्याही पाण्याने बनवण्यात येतात. लोकांचे स्वच्छते कडे काहीच लक्ष नसते. घाणेरड्या हातांनी खाद्यपदार्थ विकतात असेही बरेचसे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला तर तुमचे मन भरकटेल, हे प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली येथील इज्जतनगर मधील आहे. येथे एका भाजीविक्रेत्याने विक्रीसाठी ठेवलेल्या भाजीवर थुंकून आणि लघवी करून त्याची विक्री करत असे. दरम्यान, भाजी विक्रेत्याचे हे कृत्य तेथील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केले आहे. हा व्हिडीओ तेथील स्थानिकांनी पाहिल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | नजरचुक झाली आणि मुंबई लोकल ट्रेनने तरुणाचा घात केला, अपघाती मृत्यू CCTV कॅमेऱ्यात कैद
Video Viral | आज पर्यंत आपण अनेकदा ऐकले असेल किंवा काही जणांनी पाहिले सुद्धा असेल की, रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या धडकेत झालेला मृत्यू. काही टेन्शनमुळे तर काही जण नकळत ट्रेन खाली मृत्यू मुखी पावतात. दरम्यान, असाच एक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर ट्रेनच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे तर ही घटना 21 सप्टेंबर बुधवारची गोष्ट आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | पिटबुल कुत्र्याचा गायीवर हल्ला, गायीचा जबडा सोडवण्यासाठी अनेकांचा प्रयत्न, पण पिटबुलची ताकद व्हायरल व्हिडिओत पहा
Viral Video | कुत्रा मांजर म्हणजे सर्वांच्या जवळचा विषय आहे. आजकाल प्रत्येक घरामध्ये कुत्रा आणि मांजर पहायला मिळते. प्रत्येक जण वेगवेगळ्या जातीचे कुत्रा मांजर पाळत असतात मात्र ते आपल्याला इजा करू नये याची तेवढीच काळजी घ्यायला हवी. दरम्यान, कुत्र्यांमध्ये एक प्रजात आहे जी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. तुम्ही पिटबुल कुत्र्याचे नाव तर एकलेच असेल, या कुत्र्याचा चावा किती घातक असू शकतो हे सर्वांनाच माहिती आहे. पिटबुलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये पिटबुल कुत्र्याने गायीवर हल्ला केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | माकड आणि कोंबड्याचे कडाक्याचे भांडण, पण कोंबड्याने माकडाचा सगळा माज उतरवला, हसू आणणारा व्हिडिओ व्हायरल
Video Viral | अनेकदा आपण सोशल मीडियवर मजेशीर व्हिडिओ पाहिले असतील. जंगली प्राण्यांचे व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. ते कधी एकमेकांशी भांडतात, शिकार करतात तर कधी कवटाळतात. यातून प्रत्येक वेळी काहीना काही शिकण्यासारखे असते. असो, आपण कायम पाहिले आहे मंदिराच्या आवारामध्ये वानेर दिसून येतात. त्यातली त्यात हनुमानाच्या मंदिराजवळ वानेर म्हणजे एकमेकांचे दोस्तच म्हणायला हवे. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माकड आणि कोंबड्याचे कडाक्याचे भांडण लागले आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे पुत्राच्या बचावासाठी शिंदे गटातील नेत्यांकडून 'स्क्रिप्टेड खोटा प्रचार' सुरु | सुप्रिया सुळेंचा फोटो एडिट करून बदनामीचा केविलवाणी प्रयत्न
MP Supriya Sule | खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसले आहेत असा फोटो शुक्रवारी व्हायरल झाला होता. राष्ट्रवादीचे नेते रविकांत वरपे यांनी हा फोटो ट्विट केला होता आणि श्रीकांत शिंदे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा असं खोचक ट्विटही केलं होतं. त्यानंतर शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या काळात सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्या आहेत असा फोटो ट्विट केला.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | नववधूचा अनोखा प्रीवेडींग फोटोशूट, पार्क-पर्वत किंवा धबधब्याजवळ नव्हे, चक्क रोडवरील खड्ड्यांवर, पहा व्हिडिओ
Bride Walks On Pothole | आजकाल लग्ना आधी प्रीवेडींग शुट करण म्हणजे ट्रेंडच झाला आहे. फोटोग्राफर यावेळी वधू आणि वर यांना कोणता स्टंट करायला लावेल ते सांगता येत नाही. आपण सोशल मीडियावर नवरा-नवरीयांचे व्हिडिओ पाहत असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये वधू लग्नासाठी पायी निघाली आहे. दरम्यान, पाऊस चारी दिशेला पडत आहे आणि रस्त्यांवर खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अश्यातून ती कन्या वधू लग्नासाठी पायी निघाली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलगी रोडवरून खड्डे चुकवत असताना लांबून फोटोग्राफर फोटो काढत आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई MMRDA मैदानाची क्षमता 1 लाख | भावना गवळी म्हणाल्या राज्यभरातून 10 लाख कार्यकर्ते उपस्थित राहणार - ग्राउंड फॅक्ट रिपोर्ट
MMRDA Ground Capacity | शिवाजी पार्कवर यावर्षी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचा दोन्ही गटांना मैदान न देण्याचा निर्णय रद्द करुन उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली. यावेळी न्यायालयाने शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलेली हस्तक्षेप याचिकाही फेटाळून लावण्यात आली. दरम्यान आज खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे, असे म्हणतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाचा या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई हायकोर्टाचा शिंदे गटाला झटका, बीएमसीला फटकारत ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी
Shiv Sena Dasara Melava 2022 | शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेनं महापालिकेकडे केली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचं कारण महापालिकेकडून देण्यात आलं. महापालिकेच्या भूमिकेनंतर शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने निकाल दिला. शिंदे गटाला झटका बसला असून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार शिंदे पिता-पुत्राची प्रॉपर्टी?, मुख्यमंत्री दौऱ्यावर असले की खासदार पुत्र श्रीकांत शिंदे सुपर सीएम असतात?
MP Shrikant Shinde | राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार आल्यापासूनच महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना रंगताना दिसतो आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट केलेला एक फोटो चर्चेत आहे. या फोटोनंतर राष्ट्रवादीने श्रीकांत शिंदेंचं सुपर सीएम झाल्याबद्दल अभिनंदनही केलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
IRCTC Special Package | दिवाळीतील सुट्ट्यांसाठी IRCTC चा सर्वात स्वस्त पॅकेज प्लॅन, 6 रात्री आणि 7 दिवसांसाठी याठिकाणी धमाल
IRCTC Special Package | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी उत्सवादरम्यान तुम्हाला अंदमानला घेऊन जाण्यासाठी आयआरसीटीसीने एक उत्तम टूर पॅकेज योजना आणली आहे. मध्य प्रदेशातील राजघनी भोपाळ येथून थेट अंदमानला जाण्यासाठी विमान प्रवास करून तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता. मध्य प्रदेशच्या सीमेवर उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहणारे लोकही या पॅकेजचा लाभ घेऊ शकतात. खासकरून कौटुंबिक ट्रिप किंवा हनीमून कपल्ससाठी हे पॅकेज उत्तम आहे. यासोबतच ज्यांना सणासुदीच्या काळात कमी पैशात सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | उद्धव ठाकरे खोटं बोलतात?, होय!, फक्त नारायण राणे '100 टक्के खरं' बोलतात, व्हिडिओ पहा.. तुमचाही विश्वास बसेल
Union Minister Narayan Rane | उद्धव ठाकरेंनी गटप्रमुखांसमोर केलेल्या भाषणात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर हल्ला केला. नरेंद्र मोदींवरही टीका केली. या टीकेला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना धमकीवजा इशारा दिला. भाजप नेते, शिंदे गटातील सहकाऱ्यांकडे वाकड्या नजरेनं बघितलं, तर डोळे जागेवर ठेवणार नाही, असं नारायण राणे म्हणाले.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER