महत्वाच्या बातम्या
-
Viral Video | ती पिस्तूल दाखवून स्टंट व्हिडिओ बनवत होती, डोक्याजवळ बुलेट फायर झाली, हादरवून टाकणारा व्हिडिओ व्हायरल
Viral Video | आजच्या तरुणाईमध्ये लाइक्स मिळवण्याची इतकी क्रेझ आहे की, त्यासाठी ते जोवघेणे प्रकार करतात. सोशल मीडियावर कूल ड्यूड बनण्यासाठी लोक काहीही करत असतात. मात्र, अशा लोकांच्या डोक्यात इतकी जास्त हवा जाते की कधी कधी ते स्वतःच स्वतःच्या जीवाशी खेळून जातात. आणि असा भीषण प्रकार घडतो की त्याची कल्पनाही करता येत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ इतका खतरनाक आहे की, तो पाहिल्यानंतर तुम्हीही क्षणभर स्तब्ध व्हाल.
3 वर्षांपूर्वी -
एनआयएच्या अटकेतील वाझे आणि प्रदीप शर्मा जुने मित्र | प्रदीप शर्माच्या सेनेतील प्रवेशात शिंदेंचा पुढाकार, शिंदे समर्थकांचे अज्ञान?
आज सत्ताधाऱ्यांकडूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करत विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या 50 खोक्यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर देताना सचिन ओझेचे खोक मातोश्री ओके अशी टीका करत अँटिलिया व मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अडकलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रकरणी ठाकरे घराण्यावर सत्ताधाऱ्यांकडून निशाणा साधण्यात आला. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून जे पोस्टर धरुन जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती, त्या पोस्टरवर आदित्य ठाकरेंचा फोटो लावल्याने आदित्य ठाकरेंनाही डिवचण्यात आले आहे. सत्ताधाऱ्यांकडून देण्यात असलेल्या घोषणेबाजीमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष दिसून येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
32 वर्षीय आदित्य ठाकरेंना जनतेचा राज्यभर प्रचंड प्रतिसाद मिळतोय | शिंदे गटातील सर्व 40 आमदार लक्ष करण्यासाठी एकवटले
Aaditya Thackeray | शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार गुवाहाटीला गेले होते. त्यावरूनच पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेनेसह महाविकास आघाडीतील आमदार त्यांच्याविरुद्ध ५० खोके एकदम ओके, ताट-वाटी चलो गुवाहाटी, ५० खोके खाऊन खाऊन माजलेत बोके, अशी घोषणाबाजी केली जातेय. त्यातूनच बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा झाला.
3 वर्षांपूर्वी -
आम्ही लोकसभेच्या 40 पैकी 40 जागा जिंकणार, त्यामुळेच भाजपचे 3 जावई CBI, ED आणि IT धावून आले - तेजस्वी यादव
केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, जेव्हा भाजपला राज्यात भीती वाटते किंवा तोटा होतो, तेव्हा ते सीबीआय, ईडी आणि आयटी या तीन जावयांना पुढे करतात. मी परदेशात गेल्यावर भाजप माझ्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करते. नीरव मोदीसारखे फसवेगिरी करणारे पळून जातात, तेव्हा ते काहीच करत नाहीत.
3 वर्षांपूर्वी -
तेजस्वी यादव यांची धडाकेबाज प्रतिक्रिया | त्यांना जे करायचे आहे ते करू दे, लवकरच सौ सुनार की एक लोहार की
Bihar Political Crisis | बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेत्यांच्या घरांवर सुरू असलेल्या सीबीआयच्या छाप्यांवर मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेतून बाहेर आल्यानंतर बुधवारी ते म्हणाले की, तुम्हाला जे करायचे आहे ते करा, थोडा धीर धरा. आम्ही सुद्धा सौ सुनार का एक लोहार की! लवकरच करू. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारची बुधवारी दुपारी विधानसभेत फ्लोर टेस्ट होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
एकीकडे शेतकरी, मराठा तरुणांचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न | दुसरीकडे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे समर्थकांनी भाईगिरी
महाराष्ट्राच्या विधीमंडळात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे विषय बोलायचे सोडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार एकमेकांविरोधात भिडल्याचं चित्र अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र विषय भरकटवण्याचा हा सत्ताधाऱ्याचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केली आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Work From Home | वर्क फ्रॉम होमसाठी सरकारने लागू केले नवे नियम, कोणत्या कर्मचाऱ्यांना होणार फायदा जाणून घ्या
कोरोना महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होमची संस्कृती सुरू झाली. भारतातही सरकारी आणि खासगी संस्थांतील बहुतांश कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ घरूनच काम केले. आता केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने वर्क फ्रॉम होमचे नवे नियम लागू केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
बहुमत सिद्ध करण्यासाठी आज बिहार विधानसभेचं विशेष अधिवेशन | सर्व आमदार निवांत आणि ईडी, सीबीआय आक्रमक
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आज म्हणजे बुधवारी, २४ ऑगस्टला विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नितीश कुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यावर स्थापन झालेल्या आपल्या सरकारचा राजीनामा दिला आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीतून आठव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी आज विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवलं होतं. 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत महाआघाडीला 164 आमदारांचा पाठिंबा आहे.
3 वर्षांपूर्वी -
बिहारमध्ये भाजपाची सत्ता जाताच ईडी, सीबीआयचा पारा चढला? | निमलष्करी दल घेऊन विरोधक आमदार, खासदारांच्या घरी धाडसत्र
बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारच्या फ्लोअर टेस्टपूर्वी सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे खासदार अशफाक करीम आणि एमएलसी सुनील सिंह यांच्या घरावर छापे टाकले आहेत. बुधवारी सकाळी सीबीआयचं पथक अशफाक करीम आणि सुनील सिंग यांच्या घरांवर छापा टाकण्यासाठी पटना इथं दाखल झालं. कथित लँड फॉर जॉब घोटाळ्यात हा छापा टाकण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. सुनील सिंह हे राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आहेत. जाणून घेऊयात नितीश सरकारला आज विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या कृपेमुळे रॉयल 'मर्सिडीज' लाईफ जगणाऱ्या पिता-पुत्राची राजकीय स्वार्थाने आदित्य ठाकरेंवर मर्सिडीज वरून टीका
MP Shrikant Shinde | आमदारांच्या बंडानंतर पक्ष मजबुतीकरणासाठी आमदार आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र, विरोधकांकडून त्यांच्यावर खोचक टीका केली जात आहे. आता तर खासदार तथा एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी तर आदित्य ठाकरेंच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी रिक्षावाले, पान टपरीवालेच लागतात मर्सिडीज मधून पक्ष वाढत नाही असा टोला त्यांनी ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेवर लगावला आहे. आतापर्यंत श्रीकांत शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केलेले नव्हते. पण आता दोन्ही गटातील अंतर वाढत असून आरोप-प्रत्यारोप हे वाढत आहेत. पक्ष संघटनेसाठी आदित्य ठाकरे यांचे प्रयत्न निष्फळ असल्याचेही शिंदे यांनी म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदे गटाच्या सरकारचं काय चाललंय?, मंत्रालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, तर मराठा क्रांती मोर्चाचा कार्यकर्ता सुद्धा त्याच प्रयत्नात
VIDEO | शिंदे-फडणवीस सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशन सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मंत्रालयाच्या छतावर चढले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या छतावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. युवराज चौहान असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.
3 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय | बेनामी संपत्ती प्रकरणात दोषी ठरल्यावर सुद्धा तुरुंगवासाची शिक्षा होणार नाही
बेनामी कायदा प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बेनामी व्यवहार (प्रतिबंध) दुरुस्ती कायद्यातील कलम ३ (२) घटनाबाह्य ठरवले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता बेनामी संपत्ती प्रकरणात दोषी ठरल्यास 3 वर्षांची शिक्षा होणार नाही. म्हणजेच आता शिक्षा होऊनही तुरुंगात जाणार नाही. मात्र ही दुरुस्ती १ नोव्हेंबर २०१६ पासून जुन्या प्रकरणांत लागू होणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | छोट्या बाळाला सोबत घेऊन फूड डिलिव्हरी, झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा भावूक करणारा व्हिडिओ व्हायरल
युजर्सच्या हृदयाला हात घालणारे, मनं वितळवणारे असे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी मॅन दाखवण्यात आला आहे, जो आपल्या मुलांसोबत फिरतो. जरी तुम्ही झोमॅटो डिलिव्हरी असलेल्या लोकांच्या अनेक गोष्टी ऐकल्या असतील, ज्यात लोक आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी अनेक अडचणींवर मात करत कामावर जातात, पण हा व्हिडिओ या सर्वांपेक्षा वरचढ आहे.
3 वर्षांपूर्वी -
केंद्रीय निवडणूक आयोगही सुनावणी घेऊ शकणार नाही | 25 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष
Maharashtra Political Crisis | शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यातील सत्तासंघर्ष आता 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे | 25 ऑगस्टला घटनापीठासमोर सुनावणी
शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपसोबत युती केली त्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेरीस सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्यात आले आहे. पुढील सुनावणीही गुरुवारी होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
बलात्कार प्रकरणी भाजप नेते शाहनवाझ हुसेन यांच्याविरोधात FIR नोंदवण्याच्या हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
BJP Leader Shahnawaz Hussain | भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शाहनवाझ हुसेन यांना बलात्कार प्रकरणी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. बलात्काराच्या आरोपाखाली त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याच्या दिल्ली हायकोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीला देशातील सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शाहनवाझ हुसेन यांच्यावर 2018 मध्ये बलात्काराचा आरोप होता, मात्र त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
3 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनी MSP वरून मोठ्या लढ्याची तयारी ठेवावी, मोदींचे मित्र अदानी यांच्यामुळे MSP'ची अंमलबजावणी होत नाही - राज्यपाल सत्यपाल मलिक
मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला चढवला आहे. “देशात किमान आधारभूत किंमत (एमएसपी) लागू केली जात नाही कारण पंतप्रधानांचा अदानी नावाचा एक मित्र आहे, जो गेल्या पाच वर्षांत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे, “मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसला याबाबत सांगितले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर जबरदस्त लढ्याची तयारी ठेवावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
3 वर्षांपूर्वी -
सरन्यायाधीश रमणा 26 ऑगस्ट रोजी निवृत्त होणार | दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्ष सुनावणी प्रकरणी तारीख पे तारीख
आज (22 ऑगस्ट) ही सुनावणी पार पडणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी उद्या म्हणजे 23 ऑगस्टला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आता उद्या होणाऱ्या सुनावणींमध्येही महाराष्ट्रातील प्रकरण नाही. त्यामुळे ही सुनावणी अजून लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टातील खटल्यांची सुनावणी आणि अचानक सुनावणी रजिस्ट्रीच्या लिस्टिंगमधून डिलीट होणं | चीफ जस्टीस मोठं वक्तव्य करणार
भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) एन. व्ही. रमणा यांनी गेल्या आठवड्यात (बुधवारी) वरिष्ठ वकील आणि एससीबीएचे माजी अध्यक्ष दुष्यंत दवे यांच्या खटल्यांची लिस्टिंग आणि हिअरिंग हटविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीच्या कामकाजाबाबत केलेल्या निवेदनाची दखल घेतली आणि ते म्हणाले की, ते आपल्या निरोपाच्या भाषणात या गंभीर विषयाबद्दल भाष्य करतील. पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपाची डोकेदुखी वाढली | सिसोदियांवरील CBI कारवाई, केजरीवाल यांच्या थेट गुजरातमध्ये पत्रकार परिषदा आणि सभा
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गुजरातला पोहोचलेल्या अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्याबद्दल सांगितलं की, दिल्लीच्या शिक्षणात सुधारणा करण्यासाठी ज्या व्यक्तीने एवढं काम केलं, त्या व्यक्तीवर सीबीआयकडून धाडी टाकण्यात येत आहेत, तर त्याला भारतरत्न मिळायला हवा. अरविंद केजरीवाल म्हणाले की, देशाच्या शिक्षणासाठी मनीष सिसोदियांसारख्या लोकांची गरज आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL