महत्वाच्या बातम्या
-
भारतीय लष्कर प्रमुखांच्या विधानानंतर पाकिस्तानच्या लष्कराकडून थेट युद्धाची भाषा
पाकिस्तान एक अण्वस्त्र संपन्न देश असून आमचं लष्कर कायम युद्धासाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी दिली आहे. आमचं लष्कर युद्धासाठी नेहमीच सज्ज असतं असं विधान करत, भारताच्या उत्तरावर प्रतिक्रिया दिली आहे. कालच भारताचे लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केल होत.
7 वर्षांपूर्वी -
भाजपच्या 'विकासा'च्या दिखाव्या विरुद्ध नेटकऱ्यांनी उपसले मार्मिक 'राज अस्त्र'? सविस्तर
मागील निवडणुकीत म्हणजे २०१४ मध्ये भाजपने विकासाच्या नावावर निवडणुका लढवल्या आणि भ्रष्टाचाराच्या नावाने रान उठवून काँग्रेसला सत्तेबाहेर फेकलं होत. त्यानंतर सुद्धा भाजपने ज्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आग ओकली होती, त्यातील आज किती जण तुरुंगात आहेत हा प्रश्नच आहे. इतकंच नाही तर ज्या २ स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आरोप भाजपने केला होता, त्यांना भाजपच्या राजवटीतच न्यायालयाने दोष मुक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारने राफेल खरेदीच्या माध्यमातून भारतीय सैन्यावरच सर्जिकल स्ट्राइक केला: राहुल गांधी
लवकरच भारतात सर्जिकल स्ट्राइक दिन साजरा करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारच्या अडचणी खुद्द फ्रान्समधून आलेल्या प्रतिक्रियेतून वाढल्याचे चित्र आहे. या खरेदी व्यवहारातील करारावर काँग्रेसने आधीच अनिल अंबानींच्या सहभागावर संशय व्यक्त केला होता. त्यावर मोदी सरकारने हात झटकले होते. परंतु भाजपने दिलेल्या प्रतिक्रियेच्या बरोबर विरुद्ध प्रतिक्रिया फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सावधान! आता सीएनजी तसेच घरगुती वापरातील पीएनजी गॅस सुद्धा महागणार?
आधीच डॉलरच्या तुलनेत घसरत असलेल्या रुपयामुळे इंधनाच्या म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किमती प्रचंड वाढून महागाईचा भडका उडाला आहे आणि त्यात सामान्य माणूस पुरता होरपळून निघाला आहे. त्यात आता सीएनजी तसेच घरगुती वापरातील पीएनजी गॅस सुद्धा महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सामान्यांच्या घरगुती वापरासाठी असलेल्या पीएनजी गॅसची किंमत येत्या ऑक्टोबर महिन्यात ठरविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
राफेल विमान करार: अनिल अंबानींच्या कंपनीचं फ्रान्समधूनच गुपित उघड, मोदी सरकार अडचणीत
फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी राफेल विमान करारासंबंधित धक्कादायक खुलासा केला आहे. त्यात अनिल अंबानींच्या ‘रिलायन्स डिफेन्स’ या कंपनीचं नाव भारत सरकारनेच सुचवलं होत असा खुलासा केल्याने मोदी सरकारला धक्का बसला आहे. या व्यवहारासंबंधित नेमके हेच आरोप काँग्रेसने केले होते.
7 वर्षांपूर्वी -
शेअर बाजार १५०० अंकांनी गडगडला
आज सकाळी शेअर बाजार चांगल्या तेजीत सुरु झाला होता. दरम्यान, सेन्सेक्स अजून वरती जाईल असे प्रथम दर्शनी वाटत असताना दुपारनंतर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारी सेन्सेक्समध्ये तब्बल १५०० अंकांनी घसरण झाली तर निफ्टीमध्ये सुद्धा३५० अंकाची घसरण पाहायला मिळाली.
7 वर्षांपूर्वी -
जम्मू काश्मिरात अपहरण झालेल्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांकडून हत्या, एकाची सुटका
जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात ३ एसपीओ’सहित ४ पोलीस बेपत्ता झाल्याचे समोर आलं होत. त्यानंतर दहशतवाद्यांकडूनच या चार पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण करण्यात आल्याची प्राथमिक माहिती प्रसिद्ध झाली होती. परंतु, आज ४ पैकी ३ पोलीस कर्मचाऱ्यांची दहशतवाद्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. सुदैवाने दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याला सोडून दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
नेटकरी म्हणतात; महाराजांनी खानाला आलिंगन देत त्याचा कोतळा काढलेला, तर मोदींनी शरीफांना आलिंगन देत केक खाल्ला होता
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमधील एका कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना, लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमीकावा या युद्धकौशल्याशी केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
व्हिडिओ: मोहन भागवतांनी ‘कब्रस्तान शमशान’चा उल्लेख करत मोदींना इशारा दिला?
मागील उत्तर प्रदेश निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारादरम्यान “शमशान कब्रस्तान” या शब्दांचा शिस्तबद्ध वापर केला होता. त्या निवडणुकीदरम्यान मोदींनी शमशान कब्रस्तान या शब्द तंत्राचा पुरेपूर उपयोग मतांच्या ध्रुवीकरणासाठी केला होता. दरम्यान, आरएसएस’चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शमशान-कब्रस्तान राजकारणावर टिका केली असून, समाजाच्या भल्यासाठी याचा उपयोग नसून ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण असल्याचे उद्गार काढले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
नवी दिल्ली - ट्रिपल तलाक अध्यादेशावर पत्रकार परिषद
नवी दिल्ली – ट्रिपल तलाक अध्यादेशावर पत्रकार परिषद
7 वर्षांपूर्वी -
एक दिवसाच्या मोठ्या ब्रेकनंतर पेट्रोल-डिझेल दर पुन्हा वाढले
एक दिवसाच्या मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेल दर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आजच्या नव्या दरांप्रमाणे मुंबईत पेट्रोल ६ पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९.६० तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८.४२ झाला आहे. ऐन गणेश उत्सवादरम्यान सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागत आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुन्हा मार्मिक 'राजअस्त्र' : संघ, संस्कार, लोकशाही आणि वर्गाबाहेरील २ विद्यार्थी : सविस्तर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर एकामागून एक मार्मिक अस्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या विधानाचा दाखल देत, मोदी आणि अमित शहांच्या एकाधिकारशाहीवर मार्मिक टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नवी दिल्ली - ३ पिशव्यांवर ३२ वेळा झाडू मारली मग मोदींना उमगलं हाताने उचलावी
नवी दिल्ली – ३ पिशव्यांवर ३२ वेळा झाडू मारली मग मोदींना उमगलं हाताने उचलावी
7 वर्षांपूर्वी -
'तिहेरी तलाक'विरोधी अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
यापुढे तिहेरी तलाक घेतल्यास महिलेचा पती गुन्हेगार ठरणार आहे. कारण, तिहेरी तलाकबंदी संदर्भातील अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे. त्यात विशेष भर म्हणजे काँग्रेसने विरोध केलेल्या ‘गुन्हेगारी’ या शब्दासह केंद्राने हा अध्यादेश काढला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बुलेट ट्रेन विरोधात गुजरातच्या शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील महत्वाच्या प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला आता गुजरातमधून तीव्र विरोध होण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाविरोधात हजारो शेतकऱ्यांनी मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बुलेट ट्रेनसाठीच्या भूसंपादनाला तीव्र विरोध असल्याचं म्हटलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
कार्यक्रम दिव्यांगांचा आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या संवादात 'पाय तोडण्याची' भाषा
पश्चिम बंगालमधील दिव्यांगांच्या कार्यक्रमा दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी एका व्यक्तीसोबत संवादादरम्यान थेट ‘पाय तोडण्याची’ भाषा वापरल्याने सर्वच उपस्थितांना धक्का बसला. यापूर्वी सुद्धा अनेक वेळा विवादित भाष्य केल्यामुळे प्रसार माध्यमांनी त्यांना धारेवर धरलं होत.
7 वर्षांपूर्वी -
पेट्रोलचे दर विचारताच भाजप नेत्यांकडून मारहाण
पेट्रोलचे दर विचारताच भाजप नेत्यांकडून मारहाण
7 वर्षांपूर्वी -
खळबळजनक दावा! भारतात आल्यावर मल्ल्याला ताब्यात घ्यायची गरज नाही, ‘आम्हाला गुपचूप कळवा'
इंडियन एक्सप्रेसला मिळालेल्या गोपनिय कागदपत्रांच्या आधारे हा धक्कादायक खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक करू नये, तसेच तो देशात आल्यावर आम्हाला गुपचूप पद्धतीने कळवावे, असे आदेश सीबीआयकडून देण्यात आले होते, असा दावा करण्यात आला आहे.
7 वर्षांपूर्वी -
रुपयाची घसरण व पेट्रोल-डिझेलच्या चढ्या किंमतींमुळे शेअर बाजारात एक लाख कोटींची हानी
डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची नव्याने झालेली पडझड तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतींचा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने मोठा धसका घेतल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या एक लाख कोटींचा चुराडा झाल्याचं वृत्त आहे.
7 वर्षांपूर्वी -
बडोदा, विजया बँक आणि देना बँक या ३ बँकांचे विलीनीकरण होणार
भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित अशा बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या ३ बँकांचे विलीनीकरण होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीच या संदर्भातील अधिकृत घोषणा केली. एसबीआय’च्या सहयोगी बँकांच्या विलीनीकरणानंतरचे बँकींग क्षेत्रातील हे दुसरे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.
7 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER