महत्वाच्या बातम्या
-
Instagram Down | एकाच आठवड्यात इंस्टाग्राम पुन्हा दुसऱ्यांदा डाऊन | इंस्टाग्रामने दिली माहिती
जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साइटपैकी एक इन्स्टाग्राम रात्री उशिरा डाऊन झाली (Instagram Down) होती. विशेष म्हणजे सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्राम एका आठवड्यात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळतंय. सेवा बंद झाल्यामुळे युझर्सना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. रात्री उशिरा 12 वाजल्यानंतर सुमारे एक तास परिणाम जाणवला होता. मात्र काही वेळाने पुन्हा स्थिर करण्यात कंपनीला यश आलं.
4 वर्षांपूर्वी -
Petrol Diesel Price | मुंबईत डिझेलचे शतक | पेट्रोलचे दर सुद्धा गगनाला | सामान्य लोकं हैराण
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून सलग पाचव्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात पेट्रोल 26 ते 30 पैसे आणि डिझेल 33 ते 37 पैशांनी महागले आहे. मुंबईत पहिल्यांदाच डिझेलने शंभरीचा टप्पा (Petrol Diesel Price) ओलांडला आहे. तर मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोल शंभरीपार गेले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Daily Horoscope | 9 ऑक्टोंबर 2021 | राशीनुसार नवरात्रीतील तुमचा तिसरा दिवस कसा असेल?
9 ऑक्टोंबर 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे (Daily Horoscope) तुमचे राशीभविष्य.
4 वर्षांपूर्वी -
Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja | नवरात्रीचा दिवस तिसरा | या देवीची करा पूजा आणि कपड्यांचा रंग हा परिधान करा
7 ऑक्टोबर दिवशी अश्विन सुद्ध प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाची सुरूवात झाली आहे. 7 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र साजरी केली जाईल. उद्या नवरात्रीची तिसरी माळ म्हणजेच तिसरी दिवस (Navratri 2021 Day 3 Chandraghanta Puja) आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते, नव दुर्गा मध्ये चंद्रघंटा तिसरी दुर्गा मानली जाते.
4 वर्षांपूर्वी -
MobiKwik IPO | मोबिक्विकच्या IPO'ला सेबीकडून मंजुरी | गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी
MobiKwik ला भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड कडून 1,900 कोटी रुपयांच्या आरंभिक सार्वजनिक ऑफरिंग साठी मंजुरी मिळाली. गुरुग्राम स्थित कंपनीने जुलै महिन्यात सेबीकडे IPO साठी कागदपत्रे सादर केली होती. आयपीओमधून 1,900 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा (MobiKwik IPO) मानस आहे. आयपीओंतर्गत 1,500 कोटी रुपयांचे नवीन समभाग जारी केले जातील. याशिवाय कंपनीचे विद्यमान भागधारक 400 कोटी रुपयांच्या विक्रीसाठी ऑफर आणतील.
4 वर्षांपूर्वी -
IPL 2021, SRH vs MI Live Score | रोहित शर्मा 18 धावांवर बाद, मुंबईला पहिला धक्का
आयपीएल 2021 च्या लीग फेरीचा आज शेवटचा दिवस आहे. आज एकाच वेळी दोन सामने खेळवले जात आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एक सामना खेळवला जात आहे. तर दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. मुंबईच्या संघाच्या प्लेऑफच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत, तर सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून (IPL 2021 SRH vs MI Live Score updates) पूर्णपणे बाहेर पडला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Muhurat Trading on Lakshmi Pujan | दिवाळीतच मिळते ही संधी | मग यंदा करा शेअर बाजारात प्रवेश
दररोज हजारो कोटी रुपयांचा व्यवहार करणाऱ्या शेअर बाजाराने अनेक वर्षांपासून आपल्या परंपरा जपल्या आहेत. यातली सर्वांत महत्त्वाची परंपरा म्हणजे दिवाळीच्या दिवशीचं मुहूर्त ट्रेडिंग. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर (Muhurat Trading on Lakshmi Pujan) शेअर बाजारात ट्रेडिंग केलं जातं. गुंतवणूकदार मुहूर्त ट्रेडिंगच्या विशेष प्रसंगी नव्या गुंतवणुकीस सुरुवात करतात. मुहूर्त ट्रेडिंग शुभ मानलं जातं.
4 वर्षांपूर्वी -
SBI Gold Deposit Scheme | घरात सोनं आहे पण वापरात नाही? | अशी करा कमाई
अनेकदा घरामध्ये असणाऱ्या सोन्याच्या वापर केला जात नाही. ते लॉकरमध्ये पडून राहतं, दरम्यान याच सोन्यातून तुम्ही कमाई करू शकता. जर तुम्हाला सोन्यातून कमाई करायची असेल तर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मध्ये जमा करू शकता. एसबीआयची रिव्हॅम्पड गोल्ड डिपॉझिट योजना म्हणजेच आर-जीडीएस (SBI Gold Deposit Scheme) मुदत ठेवीप्रमाणे काम करते. या योजनेअंतर्गत ग्राहक त्यांचे सोने जमा करू शकतात आणि व्याजाच्या स्वरूपात रक्कम मिळवू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
EPF Money Withdrawal | EPF नियमात बदल | घरबसल्या तासाभरात १ लाख रुपये काढू शकता - पहा प्रोसेस
सामान्य लोकांच्या पैशांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने भविष्य निधीबाबत नवीन सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत आता तुम्ही तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून 1 लाख रुपये अँडव्हॉन्स काढू (EPF Money Withdrawal) शकता. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन काळात तुम्ही हे पैसे काढू शकता. तसेच या अँडव्हॉन्स पैशांसाठी अर्ज केल्यानंतर, बँक खात्यात पैसे हस्तांतरण करण्याची वेळ (डीबीटी) देखील कमी केली गेली आहे. यासाठी सरकारने नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत
4 वर्षांपूर्वी -
TATA Sons Wins Air India Bid | एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात
तब्बल ६८ वर्षांनंतर सरकारी विमान कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा समुहाच्या ताब्यात गेली आहे. Air India साठी पॅनलनं (TATA Sons Wins Air India Bid) टाटा समुहाची निवड केली. एअर इंडियासाठी टाटा समुह आणि स्पाईसजेटच्या अजय सिंग यांनी बोली लावली होती. दरम्यान, टाटा समुहानं यासाठी सर्वाधिक १८ हजार कोटी रूपयांची बोली लावली होती.
4 वर्षांपूर्वी -
Nokia T20 Tablet | Nokia T20 Tablet लाँच | काय आहेत फीचर्स
प्रसिद्ध टेक कंपनी एचएमडी ग्लोबलने नुकताच नोकियाचा एक उत्तम डिव्हाइस लाँच (Nokia T20 Tablet) केले आहे. कंपनीचा हा लेटेस्ट टॅबलेट नोकिया टी 20 आहे. हा टॅबलेट उत्तम वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. यामध्ये, वापरकर्त्यांना 2K डिस्प्ले मिळेल आणि 8-मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा सेन्सर मिळेल. व्हर्च्युअल परस्परसंवादासाठी टॅब्लेट ड्युअल मायक्रोफोन आणि स्टीरिओ स्पीकर्ससह येतो. नोकिया टी 20 मध्ये दिवसभरातील बॅटरी दिवसभर चालेल. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर …
4 वर्षांपूर्वी -
MCX Real Time Energy Index ENRGDEX | MCX कडून देशातील पहिला रिअल टाइम एनर्जी इंडेक्स लाँच
MCX ने देशातील पहिला रिअल टाइम एनर्जी इंडेक्स लाँच केला (MCX Real Time Energy Index ENRGDEX) आहे. ज्यात गुंतवणूकदारांना कच्च्या आणि नैसर्गिक वायू या दोन्हीसाठी कॉन्टॅक्ट मिळतील. याबद्दल MCX तज्ज्ञांनी नेमकी कोणती माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
Sharad Pawar Vs BJP | ज्या बँकेचे मी सदस्यच नव्हतो त्यावर ED'ने मला नोटीस पाठवलेली, नंतर काय झालं? - पवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्या संस्थांवर छापे टाकले असतील, तर कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण (Sharad Pawar Vs BJP) केले जात आहे, वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर केला जात आहे, याचा आता जनतेनेच विचार करावा, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली होती.
4 वर्षांपूर्वी -
Navratri 2nd Day | ८ ऑक्टोबर, द्वितीयेला करा माता ब्रह्मचारिणीची पूजा | काय आहे पौराणिक आख्यायिका?
हा सण माता भगवतीची उपासना, संकल्प, साधना आणि सिद्धीचा दिव्य काळ आहे. शरीर आणि मन निरोगी ठेवण्याची आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचीही ही एक संधी आहे. देवी भागवतानुसार, सृष्टीचे त्रिदेव -ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या रूपात विश्वाची निर्मिती, देखभाल आणि नाश करणारी देवी आहे. महादेवाच्या सांगण्यावरून माता पार्वतीने (Navratri 2nd Day) रक्तबीज शुंभ-निशुंभ, मधु-कैटभ इत्यादी राक्षसांचा वध करण्यासाठी असंख्य रूपे धारण केली, परंतु देवीच्या मुख्य नऊ रूपांची पूजा केली जाते.
4 वर्षांपूर्वी -
RBI Monetary Policy | रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर | रेपो रेट 4% वर कायम
मागील दीड वर्षापासून देशात ठाण मांडून बसलेल्या करोनामुळे अर्थव्यवस्थेवर आलेल्या संकटाचा सामना कसा करावा हा मोठा प्रश्न सरकार आणि प्रशासनासमोर होता. मात्र, लसीकरणाचा वेग हळूहळू वाढू लागल्यामुळे अर्थव्यवस्था देखील काहीशी पूर्वपदावर येऊ लागली आहे. परिणामी बाजारात काही प्रमाणात तेजी दिसू लागली आहे. आता रिझर्व्ह बँकेने नुकत्याच (RBI Monetary Policy) जाहीर केलेल्या निर्णयानुसार रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट अर्थात व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Air Force Day 2021 | भारतीय वायूसेना वर्धापनदिनाच्या निमित्ताने दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा
आज भारताच्या संरक्षणासाठी झटणार्या तीन दलांपैकी वायूसेनेचा वर्धापनदिन आहे. 89व्या वर्धापन दिनी (Air Force Day 2021) आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्यासह सर्वसामान्यांनी वायूसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा शेअर केल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Points Table IPL 2021 | ‘मुंबई इंडियन्स’ आत की बाहेर? | कसं ठरणार?
दडपणाखाली कामगिरी उंचावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सला अद्यापही यंदाच्या हंगामात बाद फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’मधील निर्णायक साखळी सामन्यात पाच वेळा विजेत्या मुंबईला ‘जिंकू किंवा मरू’ या धोरणासह खेळावे (Points Table IPL 2021) लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Lakhimpur Kheri Violence | सुप्रीम कोर्टाच्या कठोर भूमिकेमुळे यूपी सरकारवर मंत्र्याच्या मुलाच्या अटकेसाठी दबाव वाढला
लखीमपूर खिरीत ४ शेतकऱ्यांसह ८ जणांच्या मृत्यू प्रकरणात (Lakhimpur Kheri Violence) सुप्रीम कोर्टाच्या कठोर प्रश्नांमुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिषच्या अटकेसाठी दबाव वाढला आहे. यूपी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी आशिषच्या घरावर नोटीस चिकटवून शुक्रवारी सकाळपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याआधी पोलिसांनी लवकुश आणि आशिष पांडेय यांना अटक केली, तर इतर तिघांची चौकशी सुरू आहे.
4 वर्षांपूर्वी -
NCB and Criminal Gosavi | फसवणूक, धमकी देणे असे ३ गुन्हे दाखल असलेला फरार गुन्हेगार NCB सोबत कारवाईत सामील
गोसावी कार्डेलिया क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने सहभागी असल्याचे उपलब्ध व्हिडीओ व फोटोवरून दिसून येते. आर्यन खानला दंडाला पकडून नेताना तसेच त्याच्या समवेत सेल्फी घेणारा गोसावी हा (NCB and Criminal Gosavi) एखादा अधिकारी असावा असा समज झाला होता. त्यामुळे एनसीबीने सोमवारी तो खासगी व्यक्ती असून त्याचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
Property Buying Expensive | वर्षभरात मालमत्तेच्या किमती 25% वाढल्या | घर खरेदी करणे महागणार
देशातील रिअल इस्टेट क्षेत्राला मागील २ वर्षात मोठा आर्थिक धक्का बसला आहे. मात्र आता त्यात काही बदल होत आहेत. खरेदीदारही पुन्हा घर घेण्यासाठी स्वारस्य दाखवत आहेत. टियर 2 शहरांमध्ये याचा महत्त्वपूर्ण परिणाम झालाय. देशातील टियर 2 शहरांमध्ये गेल्या एका वर्षात किमती 10 ते 25 टक्क्यांनी (Property Buying Expensive) वाढल्यात. येत्या सहा महिन्यांत यात आणखी 15 टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC