नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या एनआरसी कायद्याविरोधात सध्या देशातील बहुतांश भागात तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही, अशी माहिती गृहमंत्रालयाने आज लोकसभेत दिली.

लोकसभा खासदार चंदन सिंह, नागेश्वर राव यांनी गृहमंत्रालयाला काही प्रश्न विचारले होते. सरकार NRC कायदा लागू करण्याबाबत पावलं उचलत आहे का? राज्य सरकारांशी याबाबत चर्चा केली आहे का? यासह ५ प्रश्न विचारले होते. या प्रश्नांच्या उत्तरात केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत लिखित स्पष्टीकरण दिलं. “आतापर्यंत भारत सरकारने संपूर्ण देशभरात NRC कायदा लागू करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही”.

मागील २ महिन्यांपासून संपूर्ण देश सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यावर उतरला आहे. एनपीआर प्रक्रिया आधी राबवण्यात आली आहे. यावेळी काही साधे प्रश्न विचारण्यात आले होते. वडिलांची जन्मतारीख वैगेरे प्रश्न यावेळी विचारण्यात आले होते,” असं आझाद गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे. सरकार हा हिंदू आणि मुस्लिमांचा प्रश्न असल्याचं दर्शवत आहे, पण आम्हाला तसं वाटत नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

 

Web Title:  Union Home Ministry big announcement in loksabha over implementation on NRC across country.

देशभरात NRC लागू करण्यावरून मोदी सरकारची पलटी? केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्वाची माहिती