15 December 2024 4:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

Investment Scheme | कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ही गुंतवणूक योजना आधारस्तंभ, पैसे दुप्पट करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय

Investment scheme

Investment Scheme | LIC ही भारतातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी असून ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून देखील प्रसिद्ध आहे. LIC ने आपल्या ग्राहकांसाठी अनेक एंडॉवमेंट योजना, संपूर्ण जीवन विमा योजना, मनी-बॅक प्लॅन आणि टर्म अॅश्युरन्स योजना सुरू केल्या आहेत. या लेखात आपण LIC च्‍या सर्वोत्कृष्‍ट पॉलिसी आधार स्‍तंभ योजनेबद्दल माहिती देऊ. या योजनेच्या फायद्यांमध्ये परिपक्वता आणि लाभासह तुम्हाला इतर अनेक लाभ मिळतील हे नक्की. चला तर मग जाणून घेऊ

एलआयसी आधार स्तंभ पॉलिसी – नॉन-लिंक्ड आश्वासित योजना :
ज्या भारतीय नागरिकांकडे आधार कार्ड आहे, त्यांच्यासाठी LIC आधारस्तंभ पॉलिसी योजना ऑफर केली गेली आहे. ही एक नॉन-लिंक्ड, सहभागी, वैयक्तिक योजना असून याचा अर्थ ही पॉलिसी हमखास उच्च परतावा देऊ शकते, जी इक्विटी मार्केटशी जोडली जाणार नाही. या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित राहतील याची हमी देण्यात आली आहे. एलआयसी आधारस्तंभ पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला दुर्दैवी मृत्यू झाल्यास आर्थिक मदत मिळेल, आणि पॉलिसीधारकाच्या मुदतपूर्तीपर्यंतच्या हयातीवर मॅच्युरिटीवर एकरकमी चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा रक्कम दिली जाईल.

वयोमर्यादा :
LIC आधारस्तंभ पॉलिसीची सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे गुंतवणूकदाराकडे आधार कार्ड असणे खूप गरजेचे आहे. योजेचा लाभ घेण्यासाठी वय किमान 8 वर्ष आणि कमाल वय मर्यादा 55 वर्षे आहे. पॉलिसी परिपक्वतेच्या वेळी योजनाधरकाचे कमाल वय 70 वर्षे असेल. म्हणजेच 70 वर्ष ही पॉलिसी परिपक्वतेची मुदत असेल.

विम्याची गुंतवणुकीची किमान रक्कम :
या योजनेंतर्गत प्रति योजनाधरक किमान मूळ विमा रक्कम 75,000 रुपये ठरवण्यात आली आहे. तर प्रति व्यक्ती कमाल मूलभूत विमा रक्कम 300,000 रुपये असेल. दुसरीकडे, मूळ विमा रक्कम चा हफ्ता 5,000 रुपयांच्या पटीत असेल. त्याची किंमत 75,000 ते 1,50,000 रुपयांपर्यंत असू शकते. जर मूळ विमा रक्कम 1,50,000 रुपये पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक 10,000 रुपयेच्या पटीत करावी लागेल.

प्रीमियम भरण्याची मुदत :
या योजनेचा वार्षिक प्रीमियम हफ्ता 10821 रुपये असेल. तुमचा प्रीमियम सहामाही आधारावर रुपये 5468 असेल आणि तिमाही आधारावर 2763 रुपये हफ्ता तुम्ही भरू शकता. आणि मासिक आधारावर तुम्हाला फक्त 921 रुपये प्रीमियम भरावे लागेल. अशा प्रकारे तुमचा दैनिक प्रीमियम म्हणजेच प्रती दिवस तुम्हाला 29 रुपये भरावे लागेल. या योजनेचा कमाल परिपक्वता कालावधी 20 वर्षे असून पॉलिसीमध्ये विमा रक्कम 3 लाख रुपये असते आणि सोबतच लॉयल्टी एडिसन्स 97500 रुपये असेल.

दुप्पट परतावा :
समजा जर आता तुमचे वय 20 वर्षे आहे. आणि तुम्ही ह्या पॉलिसी मध्ये गुंतवणूक केली तर पुढील 20 वर्षापर्यंत दररोज 29 रुपये जमा करा. अशा प्रकारे तुमची एकूण 206507 रुकायेची गुंतवणूक होईल. पोलिसीच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 3,97,500 रुपये परतावा मिळेल. यापैकी 3,00,000 रुपये तुमची विम्याची रक्कम दिली जाईल, आणि 97,500 रुपये एडिसनच्या लॉयल्टीतून दिले जातील.

सविस्तर माहिती :
तुम्ही ही पॉलिसीधारक योजना कधीही सरेंडर करू शकता. जर तुम्ही पॉलिसी चा प्रीमियम किमान 2 वर्षांसाठी भरला असेल तर तुम्हाला योजना कधीही बंद करण्याची मुभा मिळेल. त्याचप्रमाणे, जीवन लाभ पॉलिसीसाठी किमान वय 8 वर्षे ठरवण्यात आले आहे. आणि 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 59 कमाल वय मर्यादा ठरवण्यात आली आहे. 21 आणि 25 वर्षांच्या पॉलिसीसाठी कमाल वय मर्यादा अनुक्रमे 54 आणि 50 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. किमान विमा रक्कम 2 लाख रुपये असेल, तर कमाल परिपक्वता वय 75 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. तुम्हाला विमा प्रीमियम अनुक्रमे 15,000, 25,000 किंवा 50,000 रुपये च्या किमान रकमेसह त्रैमासिक, सहामाही किंवा अगदी वर्षाची रक्कम एकदाच भरण्याची मुभा दिली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Investment scheme of LIC Adharstambh policy benifits on 17 August 2022.

हॅशटॅग्स

#Investment Scheme(36)#LIC(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x