नगर : नगर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. काँगे्रसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील हे भाजपामधून उभे आहेत. मात्र त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप हे भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.
या भागातील राजकारण पक्षनिष्ठेपेक्षा नात्यांच्या गुंत्यासाठी ओळखले जाते. राधाकृष्ण विखे-पाटील हे काँगे्रसचे असून भाजपमध्ये गेलेल्या आपल्या मुलाचा प्रचार करणार असतील तर मग आमचे जावई असलेले संग्राम जगताप यांचा प्रचार आम्ही का करू नये? असा सवाल दस्तुरखुद्द भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. इतकेच नाही तर हे कार्यकर्ते उघडपणे संग्राम जगतापांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे भाजप उमेदवार सुजय विखेंसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. मुलाचा प्रचार करताना राधाकृष्ण विखे-पाटलांचीही डोकेदुखी वाढली आहे.
