रामराजे-उदयनराजेंची खास भेट | साताऱ्यातील दोन राजेंचा राजकीय वाद मिटला
सातारा, १ नोव्हेंबर: जिल्हयाच्या राजकारणात एकमेकांशी राजकीय वितुष्ट असणारे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी चक्क एकमेकांना नमस्कार करत दिलखुलास गप्पा मारल्या. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या तब्बेतीची चौकशी करत काळजी घेण्याचा सल्लाही एकमेकांना दिला. हा दुर्मिळ योग साताऱ्याच्या शासकीय विश्रामगृहात सायंकाळी साडेसहा वाजता जुळून आला. रामराजे- उदयनराजे यांच्या भेटीची जिल्हयाच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे यांच्यात झालेल्या जोरदार राजकीय शेरेबाजीमुळे चांगलेच वितुष्ट आले होते.
रामराजे नाईक निंबाळकर व उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीआधीपासून सुरू आहे. हा वाद मिटविण्याचा प्रयत्न खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केला. पण उदयनराजें व रामराजेंचा थेट राजघराण्याच्या स्वभावामुळे यात यश आले नाही. दोघांमध्ये २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत व कायम वादविवाद होत राहिले.
रामराजेंच्या टीकेला जोरदार उत्तर देण्यासाठी उदयनराजे यांनी फलटण गाठले होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाजलेल्या पावसातील सभेतही रामराजे यांनी उदयनराजे यांच्यावर कडवी टीका केली होती. त्यामुळे दोन राजघराण्यांतील विसंवादाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली होती. काही वेळा दोन्ही राजे साताऱ्यातील विश्रामगृहातच आमनेसामने आले होते. तेव्हा तो राजकीय ताण सांभाळताना पोलिसांची प्रचंड कसरत झाली होती. खासदार उदयनराजे भोसले शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या दरम्यान एका बैठकीच्या निमित्ताने शासकीय विश्रामगृहात पोहचले.
दरम्यान, त्यांच्याकडे कामानिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे व इतर काहीजण भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान, शासकिय विश्रामगृहात अचानक खासदार उदयनराजे भोसले आले. पोर्चमध्ये येताच त्यांनी कोण थांबलंय असे विचारले. त्यावेळी रामराजे साहेब असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उदयनराजे गाडीतून उतरले व थेट रामराजे बसलेल्या एक नंबरच्या सुटमध्ये गेले.
News English Summary: Ramraje Naik Nimbalkar, Speaker of the Legislative Council and Udayanraje Bhosale, MP, who are politically dissatisfied with each other in the politics of the district, greeted each other on Saturday and chatted heartily. The two leaders also advised each other to take care of each other’s health. This rare yoga match was held at the Government Rest House in Satara at 6.30 pm.
News English Title: BJP MP Udayanraje Bhosale and Ramraje Nimbalkar meet at Satara News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट