1 May 2025 9:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत | औरंगजेबाचे नाही - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil, Shivsena, Aurangabad, Sambhajinagar

पुणे, ०१ जानेवारी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. त्यामुळे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालंच पाहिजे,” अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन संघटनात्मक आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही मागणी केली आहे.

औरंगाबादच्या नामांतरासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल असून, त्याला गती देऊन शहराचे नाव बदललेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे आम्ही वंशज आहोत, औरंगजेबाचे नाही. औरंगजेब हा एक आक्रमणकारी होता. त्यामुळे या शहराचे नामांतर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे करावे”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्यावेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे सामनाच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही, मग अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे” असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

 

News English Summary: We are the descendants of Chhatrapati Shivaji Maharaj and Chhatrapati Sambhaji Maharaj, not Aurangzeb. Therefore, Aurangabad should be renamed as Sambhajinagar, demanded BJP state president Chandrakant Patil. On the backdrop of Aurangabad Municipal Corporation elections, Chandrakant Patil met the office bearers of Bharatiya Janata Party in Aurangabad district and took an organizational review. After this, while talking to the media, Chandrakant Patil has made this demand.

News English Title: Chandrakant Patil criticised Shivsena over Aurangabad Sambhajinagar naming issue news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या