2 May 2025 9:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

धनगर समाजाचा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित | अन्यथा चौकाचौकात नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू

Dhangar community, Dhangar Quota, Modi Govt, Dhangar Arakshan

मुंबई, २७ सप्टेंबर : यातच काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला एसटीचा दाखला द्यावा यासाठी ढोल बजाओ, सरकार जगाओ हे आंदोलन केले, त्यांनी धनगर एसटी आरक्षण द्या अशी मागणी केली. मात्र धनगर समाजाचा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहे, धनगर समाजाचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसुचित जमातीत केला आहे. मात्र गेल्या ७० वर्षापासून अनुसुचित जमातीत असून आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे आता केंद्र सरकारने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत बघू नये असं धनगर समाजाचे नेते अँड दिलीप एडतकर यांनी सांगितले आहे.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनगर समाजाला न्याय द्यावा, अन्यथा चौकाचौकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू, केंद्रीय मंत्र्यांचे पुतळे जाळू, त्यांच्या घरात मेंढरे सोडू, खासदार आणि मंत्र्याच्या घरासमोर घंटानाद करुन या बहिऱ्या सरकारने कान कसे उघडतील याची दक्षता घ्यावी, त्यामुळे आमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नाहीतर नरेंद्र मोदींच्या सरकारचा अंत जास्त दूर नाही एवढं लक्षात ठेवावं असा इशारा धनगर समाजाने दिला आहे.

तत्पूर्वी आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाची नाराजी लक्षात घेऊन फडणवीस सरकारने राज्याच्या २०१९-२० अर्थसंकल्पात स्वतंत्र अशी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर या समाजासाठी तब्बल २२ योजना सुरू करणार असल्याची घोषणा तत्कालीन फडणवीस सरकारने केली होती.

राज्यातील धनगर समाजाची लोकसंख्या राज्यातल्या एकूण लोकसंख्येच्या (११ कोटी २५ लाख ) ९ टक्के आहे आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीत हा समाज भाजपच्या बाजूने उभा होता. राज्यातल्या बारामती, माढा, सोलापूर, सातारा या चार लोकसभा मतदारसंघात हा समाज प्रभावशाली असून अन्य विधानसभा मतदारसंघापैकी ३०-३५ मतदारसंघात या समाजाचे प्राबल्य आहे. इतक्या प्रभावशाली असलेल्या या समाजघटकाला न दुखावण्याची खेळी फडणवीस सरकारला करावी लागली होती ज्यासाठी केंद्रातून काहीच हालचाली झाल्या नव्हत्या.

 

News English Summary: A few days ago, BJP MLA Gopichand Padalkar staged an agitation called ‘Dhol Bajao, Sarkar Jagao’ to demand Dhangar ST reservation. However, the issue of Dhangar Samaj is related to the Central Government. Babasaheb Ambedkar has done it in the Scheduled Tribes.

News English Title: Dhangar community warn Modi Govt for Dhangar quota Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या