13 December 2024 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

भाजपचं राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन | नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन

BJP, Electricity bill Holi agitation, November 23, MahaVikas Aghadi

मुंबई, २० नोव्हेंबर: राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारला वीजबिलात सवलत देण्यास भाग पाडण्यासाठी सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केले.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना अवाजवी वीजबिले आली. त्यानंतर सरकारने याबाबत दिलासा देण्याचे जाहीर केले होते. परंतु, काहीच दिवसांपूर्वी राज्याच्या ऊर्जामत्र्यांनीच वीजबिलाबाबत दिलासा देता येणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. याच पार्श्वभूमीवर, या सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून राज्यव्यापी वीजबिल होळीचे आंदोलन करण्यात येणार आहे”, असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे.

चंद्रकांत पाटील पुढे असेही म्हणाले की, “कोरोना काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने आधीच नागरिकांना फार मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यातही अजून वीज कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना आवाजवी वीजबिले आली आहेत. परंतु, सरकार याबाबत लोकांना दिलासा तयार नाही. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने या प्रश्नावर जनहितासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सोमवारी ठिकठिकाणी वीजबिलांची होळी करून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतील”.

 

News English Summary: Shiv Sena-Congress-NCP alliance government in the state to force the government to give concessions in electricity on Monday. Bharatiya Janata Party (BJP) will organize a state-wide electricity bill Holi agitation on November 23 and a large number of citizens should participate in it, appealed BJP state president Chandrakant Patil.

News English Title: BJP will organize a state wide electricity bill Holi agitation on November 23 news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x