महत्वाच्या बातम्या
-
बारामती | उपमुख्यमंत्री अजित पवारांची रिक्षातून अनोखी सफर
पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असतात. आज तर अजित पावर यांनी चक्क रिक्षाची ट्रायल घेतली. अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सोलापुरातील काँग्रेस भवनावर हल्ला | दगड आणि शाई फेकून हल्लेखोर फरार
सोलापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या काँग्रेस भवनवर आज शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक आणि शाई फेकून नव्या राजकिय वादाला सुरुवात केली आहे. काँग्रेस भवन येथे हल्ला झाला याची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे धावून आले.
4 वर्षांपूर्वी -
भारती पवार, कपिल पाटील, कराडांनीही जनआशीर्वाद यात्रा काढली | पण यात एकच अतिशहाणा निघाला - संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते नारायण राणेंना करण्यात आलेल्या अटकेवरून बोचरी टीका केली आहे. फार बोलत नाही पुढल्या कार्यक्रमाला जायचं आहे. अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोकणी लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला धक्का | मोदी सरकारकडून कोंकण रेल्वेचे खाजगीकरण ?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी परवाच 6 लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा उपक्रमाची घोषणा केली आहे या योजनेंतर्गत रेल्वे, ऊर्जा ते रस्त्यापर्यंत अनेक मूलभूत सेवा-सुविधांच्या क्षेत्रातील सरकारी संपत्तीचे मॉनेटायझेशन केले जाणार असल्याचे देखील अर्थमंत्र्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रातील सरकारी संपत्ती खासगी क्षेत्राकडे सोपवण्याचा निर्णय घेतला असून नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाइन असे या उपक्रमाला नाव देण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या नाशकात मतदारांप्रमाणे इतर पक्षातून दत्तक घेतलेले नेते सुद्धा कंटाळले | सेनेच्या संपर्कात
नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. शिवसेना खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शिवसेना भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. कारण भाजप नेते आणि माजी उपमहापौर प्रथमेश गिते हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. प्रथमेश गिते हे माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही | त्यामुळे मी इन्स्टंट कॉफी पित नाही - सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चेतील हवाच काढली. मी इतकं इम्पलसिव्ह आयुष्य जगत नाही. माझं आयुष्य ब्रेकिंग न्यूज नाही. कोणी काही बोललं तरी मी थोडा वेळ विचार करते, असं सांगतानाच राजकीय मतभेद बाजूला ठेवून कोणी वैयक्तिक नाती जपत असेल तर त्यात काही गैर नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
गडकरींचं मंत्रालय निधी देतंय | सूक्ष्म आणि लहान मंत्रालयातून काय निधी मिळणार? | ते पूर्वीचं अवघड खातं
करोना संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांनी करोना त्याच्या नियमावली संदर्भात प्रशासनाला काही सूचना केल्या. यावेळी त्यानी सध्या राज्यात घडत असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिलेल्या खात्यावर निशाणा साधला. त्यांच्या मंत्रालयाकडून काय निधी मिळणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, मी एकटा काय करु? - अण्णा हजारे
देशातील राजकारणात काही वाद किंवा चर्चा सुरू झाल्यावर सर्वांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची आठवण येत असते. अशा वेळी आता अण्णा हजारे कुठे गेले असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो. तसेच आता अण्णा हजारे हे झोपले आहेत का? अशी विचारणाही केली जाते. आता समाजसेवक अण्णा हजारेंनीच जनतेला हा सवाल केला आहे. ‘जनता हीच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंधन, गॅसचे दर कधी कमी होणार, GST चा परतावा कधी मिळणार हे त्यांनी सांगावे - उदय सामंत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक आणि जामीनावर सुटका, या घडामोडीनंतर राणेंची जनआशीर्वाद यात्रा आज पुन्हा सुरु झालीय. यावेळी राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. त्यानंतर आता शिवसेना नेते उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंना इशारा दिलाय. संघर्ष टाळण्यासाठी तशाच पद्धतीने वागलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी -
ओबीसींच्या आरक्षणासाठी राज्य सरकार करणार सूचना | पर्यायांचा अभ्यास, शुक्रवारी पुन्हा बैठक
ओबीसींना राजकीय आरक्षणासाठी सर्वपक्षीयांचे एकमत झाले आहे. त्यानुसार सूचना, विविध पर्यायांचा अभ्यास करण्यात येत असून, येत्या शुक्रवारी राज्य सरकार यावर अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
ईडीकडून खडसेंची मालमत्ता नक्की जप्त झाली? | महसूल विभागालाही माहिती नाही? - काय आहे प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने जोरदार दणका दिल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीने खडसेंची लोणावळा आणि जळगावातील सुमारे 5 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मात्र, जळगावातील नेमकी कोणती मालमता जप्त झाली आहे, याची माहिती समोर आलेली नाही.
4 वर्षांपूर्वी -
कोकणात जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारणार | नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रेत ग्वाही
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुन्हा नव्या उत्साहात सुरू झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही या यात्रेतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी रत्नागिरीत जास्तीत जास्त फूड प्रोसेसिंग युनिट उभारण्यासाठी केंद्र सरकार मदत करेल, अशी ग्वाही दिली.
4 वर्षांपूर्वी -
टीम नाना पटोले | पृथ्वीराज चव्हाण यांची शिस्तपालन समिती अध्यक्ष पदी वर्णी | अंर्तगत वाद सुरु
काँग्रेसमध्ये नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवृत्ती होऊन सहा महिने उलटल्यानंतर त्यांना काल नवीन टीम मिळाली. टीम देखील सव्वाशे नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची भरभक्कम आहे. 18 उपाध्यक्ष 65 सरचिटणीस आणि बरीच काही पदे काँग्रेस श्रेष्ठींनी भरली आहेत. यामध्ये अर्थातच नव्या जुन्यांचा संगम म्हणत प्रदेश काँग्रेस मधल्या सर्व नेत्यांना सामावून घेण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
तो वरुण सरदेसाई येऊ देच, आता आला तर परत नाही जाणार | नारायण राणेंचं धमकी सत्र सुरूच
युवासेना सचिव वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे माघारी जाणार नाही, असा थेट इशारा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिला. ते रत्नागिरीत भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत बोलत होते. नारायण राणेंच्या अटक नाट्याच्या तिसऱ्या दिवशी भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघाली. आज राणे रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गात जाऊन या यात्रेचा समारोप करणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कोकणातील राजकीय संघर्षात 'राणे – नाईक' कुटुंबांमधील वैर नेमकं काय होतं? | काय आहे इतिहास
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील वाद पार विकोपाला पोहोचल्याचे आपण सगळेच बघत आहोत. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.
4 वर्षांपूर्वी -
दहीहंडी साजरी करणारच | आम्ही अस्वल, आमच्यावर खूप केस - संदीप देशपांडे
जन आशीर्वाद यात्रा आणि आंदोलनावेळी कोरोना नसतो का? असा सवाल करतानाच आम्ही दहीहंडी साजरी करणारच, असं मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितलं. आम्ही अस्वल आहोत, आमच्यावर खूप केस आहे, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला. संदीप देशपांडे यांनी मीडियाशी बोलताना हे स्पष्ट केलं.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसाठी आंदोलनात पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलणाऱ्या मोहसीन शेख यांना युवासेनेत सहसचिवपदी बढती
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा कारणाऱ्या आणि युवासेनेची ताकद दाखवून देणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोठं बक्षीस दिलंय. आदित्य ठाकरे यांच्याकडून युवासेना सहसचिवपदी मोहसीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर मोहसीन शेख यांच्याबद्दल चर्चा सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा जन आशीर्वाद यात्रेला विरोध नाही | पण उद्धव ठाकरेंवर विनाकारण टीका केल्यास विरोध करणार - आ. वैभव नाईक
सकाळी नियोजित वेळेत मंत्री नारायण राणे यांचे विमानतळावर आगमन झाले. अकरा वाजता मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर त्यांनी पुष्पवृष्टी केली आणि तेथून जनआशीर्वाद यात्रा सुरू झाली. त्यानंतर माजी खासदार लोकनेते स्व. शामराव पेजे तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करुन ते गोळप (ता. रत्नागिरी) येथे आंबा व काजू उत्पादकांच्या बैठकीसाठी रवाना झाले.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंसह त्यांच्या जावयाची मालमत्ता ईडी'कडून जप्त
राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना मोठा धक्का बसलाय. ईडीने गुरुवारी खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांनी तर शुक्रवारी खडसेंची मालमत्ता जप्त केली आहे. पुणे भोसरी एमआयडीसी गैर व्यवहार प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. एएनआयने आणि काही वृत्तवाहिन्यांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणेंना भर संसारातून कायमचे कोणी उठवले? - शिवसेना
महाराष्ट्राला ठाकरे आणि राणे संघर्ष तसा नवा नाही. आरोप प्रत्यारोप आणि जहरी टीकेपर्यंत असलेल्या या युद्धानं आता नवं रूप धारण केलं आहे. या दोघांमधला सामना आणि एकमेकांवरील प्रहार आता थेट कोर्ट कचेऱ्यांमध्ये रंगणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकनाट्यामुळे शिवसेना विरुद्ध राणेंच्या संघर्षानं नवं वळण घेतलं आहे. आतापर्यंत भाषणांमधून टीका आणि रस्त्यावरचा राडा एवढ्यापुरती मर्यादित असलेली लढाई आता कोर्ट कचेऱ्यांमध्ये पोहोचली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL