महत्वाच्या बातम्या
-
नाशिकमध्ये सोमवारपासून 8 वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरु | पाणी कपातीचीही भुजबळांची घोषणा
डेल्टा व्हेरिएंट आणि रुग्णसंख्येतील वाढ या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केलीय. भुजबळ यांनी आज नाशिकमधील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निर्बंधांची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये उद्यापासून सरकारी, राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचे आदेश भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना 90% टक्के अनुदानावर शेती अवजारे मिळणार | करा अर्ज, ही आहे शेवटची तारीख
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून 31 जुलैपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर योजनांमधून शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर शेती उपयोगी अवजारे व साहित्य मिळणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मनसेतील नेत्यांसोबत वाद वाढतच गेला आणि संयम संपल्याने मी शिवसेनेत प्रवेश केला - आदित्य शिरोडकर
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने धक्का दिला. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत काल शिवबंधन हाती बांधलं. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
ईडी चंद्रकांत दादांच्या सल्ल्याने आणि विरोधी पक्षाशी सल्ला मसलत करुन राज्यात काम करतेय - जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, मोदींची भेट घेण्यापूर्वी पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील दोन्ही नेत्यांनी दिल्लीत भेट घेऊन चर्चा केल्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | आरोपपत्र दाखल झाले नसल्याचे कारण देत सचिन वाझेचा जामिनासाठी अर्ज
अँटिलिया बाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेल्या माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याने एनआयए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सध्या तळोजा कारागृहात असलेल्या सचिन वाजे यांना अटक केल्यानंतर 90 दिवसात एनआयएकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. याचाचा आधार घेत वाझेनी आता जामिनासाठी अर्ज केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तासभर चर्चा | लोकसभा अधिवेशनापूर्वीच्या चर्चेमुळे महत्व
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
BIG BREAKING | विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नियुक्तीविषयी भूमिका मांडा | हायकोर्टाचे केंद्राला निर्देश
राज्यपालांनी हेवेदावे विसरून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नामनियुक्त सदस्यांची नेमणूक करावी असे राज्य सरकारच्या वतीने मुंबई हायकोर्टात सांगण्यात आले. विधान परिषदेच्या नामनियुक्त सदस्यांच्या नियुक्तीसाठी 12 नावे राज्य सरकारकडून राज्यपालांना पाठविण्यात आली आहेत. ही नावे पाठवून आठ महिन्यांचा काळ उलटून गेला आहे. तरीही अद्याप सदस्यांची नियुक्ती झाली नाही. म्हणून राज्य सरकारच्या वतीने हाय कोर्टात बाजू मांडण्यात आली.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाला इंदापूरात जोरदार धक्का | हर्षवर्धन पाटलांचे चुलत बंधू प्रशांत पाटील यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सख्खे चुलत बंधू व इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील यांच्याकडून अनिल परब आणि नार्वेकरांचं नाव घेत अप्रत्यक्षरीत्या अटकेची धमकी?... काय म्हणाले?
कुणाला अटक झाली तर प्रतिक्रिया द्यायला मी नाशिकमध्येच आहे, असं विधान करून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या धमक्या देण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. आता चंद्रकांतदादांनी मागील काही दिवसांपासून अशी विधान करत सत्ताधाऱ्यांना धमक्या देण्याचा सपाटा लावल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना नेते अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची चौकशी सुरू आहे, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मात्र त्याही पलीकडील विधान त्यांनी केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
गडकरींच्या राज्यात चाललंय काय? | धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पूल खचला, २ वर्षांतच महामार्गाची दुर्दशा
बहुचर्चित राष्ट्रीय महामार्गाचे अवघ्या काही महिन्यांतच पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच अल्पशा पावसाने पूल खचणे, रस्त्यावर पाणी साचून अपघातास निमंत्रण देणे, कठडे वाहून जाणे, खचून जाणे, रस्त्यालगत असलेले संरक्षक बेल्ट मुळासह वाहून जाणे आदी प्रकार बघावयास मिळाल्याने वाहनचालकांना या महामार्गावरून सांभाळून वाहने चालवावी लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मनसेबाबत चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही | पण योग्यवेळी निर्णय घेऊ - फडणवीस
नागपूरला परतलेल्या फडणवीसांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल, असं उत्तर फडणवीस यांनी दिलं. मुंबई महापालिका निवडणुकीला अद्याप वेळ आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असं सूचक विधान फडणवीस यांनी केलं. चंद्रकांत दादांचं विधान तुम्ही पूर्ण समजून घेत नाही. अर्धवट समजून घेता, असंदेखील फडणवीस पुढे म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
मनसेत जोरदार हालचाली | अमित ठाकरे नाशिकला रवाना | राज ठाकरे विद्यार्थी सेनेबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता
दरम्यान, मनसेत मोठ्या हालचाली सुरु झाल्या असून अधिक वेळ न घेण्याचा निर्णय झाल्याचं वृत्त आहे. त्यासाठी मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची थेट अमित ठाकरे यांचीच नेमणूक करण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याबाबत लवकरच मोठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईतील आरे मेट्रो प्रकल्पावेळी दडपशाही करणारे भाजप नेते सत्ता जाताच मालाड कुरार मेट्रोवरून रस्त्यावर
तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या निमित्ताने भाजपने मोठं राजकारण केल्याचं पाहायला मिळालं होतं. हजारो तरुण, तरुणी, सेलिब्रिटी, आणि पर्यावरण प्रेमी रस्त्यावर उतरून फडणवीस सरकारच्या आरेतील मेट्रो प्रकल्पाला विरोध करत होती. मात्र त्यावेळी फडणवीस सरकारने पत्रकारांवर देखील दडपशाही केली होती आणि शेकडो तारूंना तुरुंगात पाठवून त्यांच्यावर गुन्हे लादले होते. लोकांच्या कोणत्याही मागण्यांना फडणवीस सरकारने ढुंकूनही पाहिलं नव्हतं. मात्र आज तेच भाजप नेते सत्ता गेल्यावर मालाडच्या कुरारमध्ये मेट्रोच्या विकास कामात आणि स्वतःची मतपेटी जपण्याच्या बहाण्याने रस्त्यावर उतरवून लोकांच्या मदतीचा कांगावा करत आहेत हे विशेष म्हणावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
निवडणुकांच्या तोंडावर मनसेत भूकंप होण्यास सुरुवात | राजन शिरोडकर यांचे पुत्र आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने जबर धक्का दिला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. आदित्य शिरोडकर यांच्या अचानक पक्ष सोडण्याने मनसेला धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईचा फोटो ट्विट करत सेनेला डिवचलं | नेटिझन्सकडून 'मामी हे नागपूर पहा' म्हणत व्हिडिओ, फोटोचा सपाटा
काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचा वेग मंदावला. रेल्वे सेवेसोबतच रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूकही जवळ आल्यानं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
आरोपीच्या सांगण्यावरून एवढी मोठी कारवाई कशी होऊ शकते? | ED भाजपच्या इशाऱ्यावर नाचतंय - हसन मुश्रीफ
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेळी गट वाटप योजना | 2 बोकड आणि 20 शेळ्या | १ लाख १५,४०० रुपये अनुदान मिळणार
शेळीपालन महाराष्ट्र या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर मराठवाडा पॅकेज अंतर्गत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 2 बोकड 20 शेळ्या अशा प्रकारची योजना राबवली जाते त्याच्या अंतर्गत SC ST OBC जनरल अशा सर्व प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जातं आणि ही योजना जालना जिल्ह्यात राबवण्यात करता 2016-17 मध्ये शासन निर्णय घेण्यात आलेला होता.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकचा आसिफ आणि रसिका | लव जिहादच्या आरोपांनी मोडले लग्न | बच्चू कडूंनी घडवला समेट
नाशिकमध्ये होणाऱ्या एक आंतरजातीय विवाह सोहळ्याला लव जिहादचा रंग देत समाजातून होणाऱ्या तीव्र विरोधामुळे विवाह रद्द करण्याची वेळ मुलीच्या परिवारावर आली. अशात या मुलीच्या कुटुंबाची मंत्री बच्चू कडू यांनी भेट घेत कुटुंबाला मानसिक आधार देत पाठिंबा दर्शवला. इतकेच नाही तर मी लग्नात येऊन नाचेल, असेही बच्चू कडू यांनी म्हणत आंतरजातीय विवाह सोहळ्याला विरोध करणाऱ्याला तंबी दिली.
4 वर्षांपूर्वी -
मोठी कारवाई | अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणामध्ये ईडीने ही पहिलीच मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी या वाढल्या आहेत. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील संपत्तीवर जप्ती आणली असल्याचे वृत्त आहे.
4 वर्षांपूर्वी -
SSC Result 2021 | वेबसाइट क्रॅश, हॉलतिकीटच दिलं गेलं नसल्याने क्रमांकच माहीत नाही, निकाल कसा पहावा?
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे न घेताच निकाल जाहीर करण्यात आला. परंतु परीक्षा न देताच उत्तीर्ण होण्याचा हा आगळा वेगळा आनंद द्विगुणीत होऊ शकला नाही. ज्या बोर्डाच्या वेबसाइटवर आपले गुण किती हे पाहण्यासाठी विद्यार्थी आतुर झाले होते. ती साइटच निकालावेळी क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पास की नापास कळण्यासाठी बोर्डातील अधिकाऱ्यांना पालक आणि विद्यार्थ्यांनी दूरध्वनीवर संपर्क साधला असता थोडावेळात पाहता येईल असे जुजबी उत्तर देण्यात आले.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
Mishtann Foods Share Price | पेनी स्टॉक 52-आठवड्यांच्या जवळ पोहोचला, तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले - BOM: 539594
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC