2 May 2025 1:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या 'या' मागण्या

Maratha reservation

नवी दिल्ली, ०८ जून | मी वर्षभराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटलो. भेटीचा हेतू मी आधीच जाहीर केला आहे. आमच्या 12 मागण्या होत्या त्याबद्दल त्यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना कल्पना दिली. त्यांनी आमच्या मागण्या ऐकून घेतल्या. आम्हाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आपल्या मागण्यांची माहिती घेतो असंही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. सगळे विषय त्यांनी गांभीर्याने ऐकून घेतले आहेत. राज्याचे जे विषय आम्ही मांडले आहेत त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आम्ही कोण कोणते विषय़ पंतप्रधान नरेंद्र मोदींपुढे मांडले?

  1. मराठा आरक्षणाचा अत्यंत संवेदनशील विषय पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. त्याबद्दल योग्य ती भूमिका घ्यावी अशी विनंती केली.
  2. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथील करण्यात यावी
  3. इतर मागासवर्गीयांचं पंचायत राज निवडणुकीतील राजकीय आरक्षण हा देशपातळीवरचा विषय होऊ शकतो
  4. मागासवर्गीयांचं बढतीमधील आरक्षण हा विषयही आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडला आहे
  5. मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा उपलब्ध करून देण्याचा विषयही आम्ही पंतप्रधानांकडे मांडला
  6. GST चं येणं लवकर मिळावं यासाठीही विनंती केली आहे
  7. शेतकऱ्यांच्या पिक विम्याबाबत अटी-शर्थी संबंधी आम्ही बीड मॉडेल तयार केलं आहे त्याबद्दलही चर्चा केली
  8. बल्क ड्रग पार्क : स्पर्धात्मक निविदेस मंजुरी
  9. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळं आदळत आहेत, तौक्ते वादळानेही दणका दिला. या वेळी जे मदत केली जाते ते निकष जुने झाले आहेत. आता ते निकष बदलण्याची गरज आहे याबाबतही आम्ही चर्चा केली
  10. चौदाव्या वित्त आयोगातील थकित निधी मिळण्याबाबत चर्चा केली
  11. मराठी भाषा दिन असतो, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंबंधी योग्य ती पावलं उचलली जावीत अशीही विनंती केली.

अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला असल्याची माहिती दिली. मराठा आरक्षणातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिले असं अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. ‘आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा शिथील करावी, अन्यथा राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही’ अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात झाला पाहिजे असं मतही यावेळी त्यांनी व्यक्त केलं.

तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती मोदींना करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी असं सांगितलं असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

 

News English Summary: He gave us an idea to Prime Minister Narendra Modi about our 12 demands. They listened to our demands. Chief Minister Uddhav Thackeray has assured that Prime Minister Narendra Modi has given us a positive response and is aware of our demands.

News English Title:  PM Narendra Modi has given us a positive response and is aware of our demands said CM Uddhav Thackeray news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या