17 April 2021 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडीज असल्याने विषाणूचा फार वाईट परिणाम होणार नाही - डॉ. गुलेरिया पियुष गोयल महाराष्ट्रातून राज्यसभेवर | पण संकटात महाराष्ट्रावर निर्लज्ज राजकारणाचा आरोप राज्यावर कोरोना संकट | राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलं ११०० बेडचं कोविड सेंटर | १०० बेड्सना ऑक्सिजन सुविधा देशभरात रुग्णांना रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही, अंत्यसंस्कारासाठी रांगा तरी मोदी निवडणुकीच्या प्रचारात कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल | उद्धव ठाकरेंचं उद्योगांना नियोजनपूर्वक सज्ज राहण्याचं आवाहन तुम्ही 'प्रधान कोवइडियट' आणि सुपर स्प्रेडर आहात | देशाच्या इतिहासातील सर्वात निर्लज्ज पंतप्रधान - काँग्रेस नेत्याची टीका मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन-रेमडेसिवीर संदर्भात मोदींना कॉल केला | पण ते प्रचारात आहेत असं उत्तर मिळालं
x

अमेरिकेत गुंडगिरी करून ट्रम्प यांच्याकडून माझ्या पक्षाची बदनामी | आठवलेंची प्रतिक्रिया

RPI Leader Ramdas Athawale, Donald Trump, Capitol riots

मुंबई, १६ जानेवारी: रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले आपल्या धमाल चारोळ्यांसाठी आणि आगळ्यावेगळ्या वेशभूषेसाठी प्रसिद्ध आहेत. लोकसभेत भाषण करताना चारोळीचा उपयोग करून सभागृहाची ते वेळोवेळी दादही घेतात.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टिप्पणी केली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत. ते दोन दिवस भारताच्या दौर्‍यावर होते, तर रामदास आठवले हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष अहेत. त्यालाच अनुसरून आठवले म्हणाले जोते की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे नेते आहेत आणि मी त्या पक्षाचा अध्यक्ष आहे.

आता त्यांनी अजून एक टिपणी केली आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेत गुंडगिरी करून आपल्या रिपब्लिकन पक्षाचे नाव बदनाम केल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. रामदास आठवले यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी रिपब्लिकन नेत्या, अभिनेत्री पायल घोषही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी ही टीका केली. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत गुंडगिरी करून राजकारण करत आहे. माझ्या पक्षाचं नाव खराब करत आहेत, अशी टीका रामदास आठवले यांनी केली. तसेच 2021मध्ये देशात होणारी जनगणना जातीय आधारावर झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

 

News English Summary: Ramdas Athawale has claimed that Trump has tarnished the image of his Republican Party by bullying in the United States. Ramdas Athawale held a press conference in Delhi today. Republican leader and actress Payal Ghosh was also present on the occasion. This time he made this criticism.

News English Title: RPI Leader Ramdas Athawale slams Donald Trump over Capitol riots news updates.

हॅशटॅग्स

#Ramdas Athawale(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x