2 May 2025 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

पवारसाहेबांशी चांगला संवाद, पण कधीतरी सोनियाजींना सुद्धा मी फोन करतो - उद्धव ठाकरे

Sharad Pawar, Remote control, CM Uddhav Thackeray,  MahaVikas Aghadi

मुंबई, २६ जुलै : शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे. तसंच सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरीही स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं म्हणत मित्रपक्षांना सूचक इशाराही दिला आहे.

या तीन पक्षांतले जे प्रमुख पक्ष आहेत…शिवसेना आहेच… काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे…त्यापैकी काँग्रेसचं असं म्हणणं आहे की, मुख्यमंत्री राष्ट्रवादीला झुकतं माप देताहेत… असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “त्यांचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसजम मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे आणि तो आक्षेप अगदी तीव्र नव्हता. शेवटी असं आहे, सगळेच जण निवडणुका लढवून येत असतात. जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडून असतात, म्हणून तर जनता त्यांना मत देते आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांची चूक आहे अशातला भाग नाही आहे. तशा आशाअपेक्षा व्यक्त करणं हा गुन्हा नाही आहे. तुम्ही म्हणता तसं सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात काही असेलही, पण माझ्याशी कुणी असे ठामपणाने बोलले नाही की, तुम्ही आम्हाला विचारत नाही. माझा पवारसाहेबांशी पण चांगला संवाद आहे. अगदी नित्यनियमाने नाही, पण कधीतरी मी सोनियाजींना फोन करत असतो.”

 

News English Summary: Shiv Sena MP and executive editor of daily ‘Saamana’ Sanjay Raut interviewed Chief Minister Uddhav Thackeray. In this interview, Uddhav Thackeray has commented in detail on many issues including differences in the Mahavikas Aghadi, BJP’s Operation Lotus.

News English Title: Sharad Pawar said No remote control communication is needed CM Uddhav Thackeray said News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SoniaGandhi(7)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या