7 May 2025 1:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC IREDA Share Price | मंदीत संधी, स्वस्त झालेला शेअर देईल 55 टक्के परतावा, अशी संधी सोडू नका - NSE: IREDA BEL Share Price | 23 टक्के अपसाईड कमाई करा, अशी संधी सोडू नका; टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL
x

VIDEO पुरावे: ईव्हीएम'संदर्भात उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे ही गंभीर आरोप होते

Shivsena, EVM Machine, Raj Thackeray, MNS, Ballet Paper

वर्धा: ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, एनसीपी नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सगळेजण ईव्हीएमला विरोध दर्शवत आहेत. विरोधकांची पत्रकार परिषदही पार पडणार आहे. आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी होते आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे म्हटले आहे.

मात्र असं असलं तरी भारतीय जनता पक्षाचा सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेना नेत्यांना आणि पक्षप्रमुखांना देखील शंका असल्याने, त्यांनी देखील ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप केले होते. त्यात उद्धव ठाकरे यांनी तर एका सभेत बोलताना म्हटलं होतं की, ‘अनेक ठिकाणी ईव्हीएम’वर कोणताही बटन दाबा मत भाजपलाच जातं, तर दुसरीकडे संजय राऊतांनी देखील तसेच आरोप करत अजून टोकाची भूमिका व्यक्त करताना निवडणूक आयोगाला ‘भाजपाची टवायफ’ असं म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाच्या आणि शिवसेनेच्या ईव्हीएम संदर्भातील आरोपांवर पूर्णपणे दुर्लक्ष करून केवळ विरोधकांना टोले लागण्यात व्यस्त असल्याचं दिसतं.

दरम्यान आजच्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘खरंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी यामध्ये सामील होणं अपेक्षित होतं’ आणि नेमका हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या ईव्हीएम’वरील शंकेने त्यांची देखील निवडणूक पद्धतीवर शंका होती असंच म्हणता येईल.

VIDEO: काय आरोप केले होते भाजपने ईव्हीएम’ला अनुसरून त्याचे पुरावे

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या