महत्वाच्या बातम्या
-
Ghar Banduk Biryani Movie | नागराज मंजुळे दिग्दर्शित 'घर बंदुक बिरयाणी' सिनेमाचा टीझर लाँच
मराठी चित्रपट श्रुष्टीत नागराज मंजुळे दिग्दर्शित सिनेमांची प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. त्यात मागील दोन वर्ष कोरोना नियमावलीमुळे प्रेक्षक देखील सिनेमा गृहात जाऊन सिनेमाचा आनंद घेऊ शकलेले नाहीत. फँड्री, सैराट आणि नाळ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे एक नवाकोरा सिनेमा (Ghar Banduk Biryani Movie) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates | नेहमी वाटायचं की सोनं-चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे
मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे नेहमीच समाज माध्यमांवर सक्रीय असतात, प्रत्येक विषावर ते आपलं मत व्यक्त करत असतात. आता अभिनेते सुबोध भावे यांची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोनं आणि चांदीची तुलना पेट्रोल डिझेलसोबत (Subodh Bhave Post on Petrol Diesel Rates) केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
महेश मांजरेकर मूत्राशयाच्या कर्करोगाने होते पीडित | यशस्वी शस्त्रक्रियेनंतर घरी परतले
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांना काही दिवसांपूर्वी कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. आता बातमी आहे की, अलीकडेच त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. महेश मूत्राशयाच्या कर्करोगाने ग्रस्त होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महेश आता घरी परतले असून हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
3 वर्षांपूर्वी -
बेजबाबदार पत्रकारिता | राज कुंद्रा प्रकरणातील आरोप उमेश कामत दुसराच | बदनामी आपल्या उमेश कामतची
सध्याची पत्रकारिता सुद्धा वास्तवापेक्षा गुगल भरोसे झाली आहे असं म्हणावं लागेल. त्यात कोणतीही खातरजमा न करता कोणाचाही फोटो केवळ नावात साम्य असल्याने गुगल सर्च मध्ये मिळतो आणि तोच फोटो उचलून थेट वृत्त प्रसिद्ध केली जातात. असे प्रकार हिंदी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर घडत असल्याचं यापूर्वी देखील अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र देशभरात गाजणाऱ्या एखाद्या किळसवाण्या प्रकरणात काहीच संबंध नसणाऱ्या व्यक्तीची नाहक बदनामी केली जाते हे अत्यंत भीषण आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपच्या चक्काजामवर सुमित राघवन भडकला | म्हणाला, हा काय मूर्खपणा आहे?
भारतीय जनता पक्षानं राज्यभरात ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन सुरु केलं आहे. मुंबईतील दहिसर-मीरारोड या भागातही प्रदर्शनं केली गेली. या आंदोलनादरम्यान कोरोनाचे सर्व नियम मोडल्याचं दिसून आलं. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते. सोशल डिस्टंसिंग असण्याचा तर प्रश्नच नव्हता. या प्रकारावर प्रसिद्ध मराठी अभिनेता सुमित राघवन संतापला आहे. अशी आंदोलनं करुन नेमकं तुम्ही काय साध्य करताय? असा थेट सवाल त्यानं भाजपाला केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन
सुप्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी आपल्या विनोदी पात्रांनी गाजवलेल्या या अभिनेत्याला कोरोनाने ग्रासलं होतं. दोन आठवड्यापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर किशोर नांदलस्कर यांनी दुपारी 12.30 च्या सुमारास ठाणे इथे अखेरचा श्वास घेतला.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊन लागला तर आम्ही पूर्णपणे कोलमडून पडू | नाट्यगृहांबाबत कलाकारांची मुख्यमंत्र्यांना विनंती
कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा स्फोट महाराष्ट्रात झाला आहे. गेल्या 24 तासांत 43,183 नवीन रुग्ण समोर आले आहेत. कोणत्याही राज्यात कोरोनाची सापडलेली ही सर्वात जास्त प्रकरणे आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझील देशांमध्येच फक्त महाराष्ट्रापेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. सर्वात जास्त रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्रात जगात चौथ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी वर्षा बंगल्यावर आपत्कालीन बैठक बोलावली आहे. सध्या मुंबईत कडक नियम लागू करण्याचा देखील सरकार विचार करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | आर्चीचा परशा उतरला कुस्तीच्या मैदानात | पैलवानाला उचलून आपटला
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला आकाश ठोसर हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं सैराटमध्ये साकारलेलं परश्या हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. अकाशऐवजी त्याला आता परश्या म्हणूनच चाहते ओळखतात यावरुनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मात्र कितीही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला तरी आकाशने आपले पाय मात्र जमिनीवरच ठेवले आहेत. आजही तो गावातील मित्र-मंडळींसोबत कुस्ती खेळायला जातो. दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
Jhimma Movie Teaser | झिम्मा मराठी सिनेमाचा टीझर | 23 एप्रिलला प्रदर्शित होणार
लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर आता हळूहळू जनजीवन स्थिरावत आहे. सिनेसृष्टी देखील पुन्हा रूळावर येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत ‘झिम्मा’ या आगामी सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. हेमंत ढोमे याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वी पहिल्या पोस्टर नंतर आज त्याने टीझर शेअर केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
फँड्री फेम जब्या | सोमनाथ अवघडे'चं नवीन रोमँटिक गाणं 'रंग प्रीतीचा बावरा'
Rang Pirticha Bawara Song, फँड्री फेम जब्या उर्फ सोमनाथ अवघडे’चं नवीन रोमँटिक गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं ‘फ्री हिट दणका’ या सुनिल मगरे दिग्दर्शित चित्रपटातील आहे. हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रंग प्रीतीचा बावरा’ या गाण्यात अपूर्वा एस. आणि सोमनाथ अवघडे यांची मुख्य भूमिका दाखवण्यात आली आहे. यात हे दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. या गाण्याला बबन अडागळे आणि अशोक कांबळे यांनी संगीत दिले आहे. तसेच संजय नवगिरे यांनी हे गाणं शब्दबद्ध केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Marathi Movies | मुंबईत रंगला मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२०
Marathi Filmfare Awards 2020, मराठी सिनेसृष्टीला वेध लागलेल्या ‘ब्लॅक लेडी’ चा पुरस्कार म्हणजेच फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2021 रविवारी (28 फेब्रुवारी) मुंबईत दिमाखात पार पडला. यात मराठीसह अनेक बॉलिवूड स्टार्सने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीचे अनेक दिग्गज कलाकार, गायक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार, एकाच ठिकाणी जमले होते. ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा आणखीनच वाढली. या फिल्मफेअर सोहळ्याचे सूत्रसंचालनाची धुरा यंदा अमेय वाघ आणि सिद्धार्थ जाधव या मातब्बर कलाकारांनी सांभाळली. त्यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाने सर्वांचेच चांगले मनोरंजन केले.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | मराठीतला पहिला झॉम्बी सिनेमा | ‘झोंबिवली’ येतोय
फास्टर फेणे, क्लासमेट्स, माऊली ह्यासारख्या अप्रतिम चित्रपटांचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच त्यांचा बहूचर्चित ‘ झोंबिवली ‘ हा सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. नुकताच ह्या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे . अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी ह्यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० एप्रिल पासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येईल.
4 वर्षांपूर्वी -
स्वानंदी बेर्डे म्हणतेय | ‘धनंजय माने इथेच राहतात का?’
मराठी प्रेक्षकाच्या चेह-यावर आजही ‘धनंजय माने इथेच राहतात का?’ हे वाक्य पडलं की हसू उमटतं. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या तोंडी असलेलं हे वाक्य आता लेक स्वानंदीही उच्चारताना दिसणार आहे. स्वानंदी ‘धनंजय माने इथेच राहतात’ या नाटकातून अभिनयात पदार्पण करते आहे. हे एक विनोदी नाटक आहे. राजेश देशपांडे या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अमृता फडणवीस इज बॅक | ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं गायलं
अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘डाव’ या मराठी चित्रपटातील ‘अंधार’ हे गाणं अमृता फडणवीस यांना गायलं आहे. अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आपल्या नवीन गाण्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. अमृता यांचं गाण्याचं प्रेमही सर्वश्रृत आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
‘बहिर्जी’ स्वराज्याचा तिसरा डोळा | महाराजांच्या शिलेदाराची गाथा मोठ्या पडद्यावर
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. त्यामुळे त्यांच्या एका एका मावळ्याच चरित्र आणि मोहिमा या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले गेले आहेत. त्यामुळे आता सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा पडद्यावर अनुभवला जातो त्यावेळी प्रेक्षकांसाठी तो रोमांच उभे करणारा अनुभव असतो. जोवर आपला राजा सोबत आहे तोवर आपण मोठी मजल मारु हे प्रत्येक मावळ्यांनी मनावर बिंबवून घेतलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन झालं आहे. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी आशालता यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र कोविड न्युमोनियामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
4 वर्षांपूर्वी -
जन्मभूमी कर्मभूमी आहे ही, आई आहे ही, खाऊन भरल्या ताटात... - केदार शिंदेंकडून संताप
कंगनाने ट्विट करत आरोप केला होता, की ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असे म्हणत मला राऊत यांनी खुली धमकी दिली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यांमुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,’ असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO - स्वीटी सातारकर' चित्रपटाचा याड लावणारा टीजर आणि धमाकेदार गाणं
काही दिवसांपूर्वी अभिनेता संग्राम समेळनं स्वीटी सातारकर नामक तरुणी त्याला सतत मेसेजेस पाठवून हैराण करत असल्याची तक्रार सोशल मीडियात पोस्ट टाकून केली होती. त्यामुळे ही स्वीटी सातारकर कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. या स्वीटी सातारकरचा पत्ता आता सापडला आहे. स्वीटी सातारकर या चित्रपटाचा धमाल टीजर सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा