14 December 2024 11:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Adani Group Shares | हिंडनबर्ग रिपोर्टनंतर अदानी ग्रुप अजून एका रिपोर्टने गोत्यात, बातमी पसरताच शेअर्समध्ये मोठी घसरगुंडी, प्रकरण काय?

Adani Group Shares price

Adani Group Shares| सेबी तर्फे ‘Related Party’ म्हणजेच ‘संबंधित पक्ष’ व्यवहारांतील नियमांचे संभाव्य उल्लंघन याबाबत ‘रॉयटर्स’ या दिग्गज मीडिया हाऊसने एक लेख प्रदेश केला. आणि त्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे घसरायला सुरुवात झाली. अदानी समूहाच्या व्यवहारांशी संबंधित तपास सेबी मार्फत सुरू आहेत. उद्योग समूहाचे संस्थापक ‘गौतम अदानी’ यांचे बंधू ‘विनोद अदानी’ यांच्याशी संबंधित तीन परकीय संस्था सेबीच्या रडारवर आले आहेत. ‘अदानी एंटरप्रायझेस’ कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दुपारी 1:08 वाजता 1.68 टक्के घसरणीसह 1721 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘अदानी ग्रीन’ कंपनीचे शेअर्स 4.87 टक्क्यांच्या घसरणीसह 838.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि ‘अदानी पॉवर’ कंपनीचे शेअर्स 1.17 टक्क्यांच्या घसरणीसह 189.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर ‘अदानी पोर्ट्स’ कंपनीचे शेअर्स 0.88 टक्के घसरणीसह 636.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या कमजोरीसह ट्रेड करत होते. तर ‘अदानी विल्मर’ कंपनीचे शेअर्स 2.44 टक्क्यांच्या कमजोरीसह 395.95 रुपयांपर्यंत खाली आले होते. ‘अदानी टोटल गॅस’ कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या कमजोरीसह 859.45 रुपये किमतीवर आले होते. आणि ‘अदानी ट्रान्समिशन’ कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या घसरणीसह 943.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ACC सिमेंट कंपनीचे शेअर्स 2.39 टक्के कमजोरीसह 1707 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर ‘अंबुजा सिमेंट’ कंपनीचे शेअर्स 2.39 टक्क्यांच्या घसरणीसह 374.30 रुपयांवर ट्रेड करत होते. ‘एनडीटीव्ही’ कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या कमजोरीसह 185.70 रुपयांवर ट्रेड करत होते.

सविस्तर प्रकरण :
मॉरिशसस्थित ‘क्रुणाल ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’ आणि ‘गार्डेनिया ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’ आणि दुबईस्थित ‘इलेक्ट्रोजन इन्फ्रा’ या तीन ऑफशोर संस्था मागील 13 वर्षांमध्ये ‘पोर्ट्स पॉवर ग्रुप’ च्या उपकंपन्यांसोबत अनेक गुंतवणूक सौद्यांमध्ये प्रत्यक्षरीत्या गुंतलेल्या आहेत. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, ‘विनोद अदानी’ या संस्थांचे लाभार्थी मालक किंवा संचालक आहेत. हे कनेक्शन उघड न करणे हे ‘संबंधित पक्ष व्यवहार’ नियंत्रित करणाऱ्या नियमांचे उल्लंघन आहे, याचा सखोल तपास सेबीने सुरू केला आहे.

कायद्यातील तरतुदी :
भारतीय कायद्यानुसार थेट नातेवाईक, प्रवर्तक गट आणि सूचीबद्ध कंपन्यांचे उपकंपनी ‘संबंधित पक्ष’ म्हणून मानले जातात. प्रवर्तक समुहाची व्याख्या म्हणजे, “ज्या व्यक्तीचे एखाद्या सूचीबद्ध कंपनीमध्ये बहुसंख्य शेअर्स असतात, आणि जो व्यक्ती कंपनीच्या धोरणावर प्रत्यक्ष प्रभाव टाकू शकतो”. अशा संस्थांमधील व्यवहार स्टॉक मार्केट नियामक सेबीला आणि सार्वजनिक फाइलिंगमध्ये उघड करणे बंधनकारक आहे. एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करायचे असल्यास कंपनीच्या शेअर धारकांची मंजूरी घेणे देखील बंधनकारक असते. अशा नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित कंपन्यांना सेबी दंड लावू शकते.

अदानी ग्रुपचे स्पष्टीकरण : अदानी समूहाच्या प्रवक्त्याने मीडिया हाऊसला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, ‘विनोद अदानी’ गौतम असनी यांचे नातेवाईक आहेत. आणि त्यांच्याकडे प्रवर्तक समूहाचे शेअर्स आहेत. परंतु ते कोणत्याही सूचीबद्ध असलेल्या अदानी कंपनी किंवा तिच्या उपकंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय पदावर काम करत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Group Shares price fallen down badly check details on 04 April 2023.

हॅशटॅग्स

#Adani Group Shares Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x