15 December 2024 5:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअरमध्ये मजबूत खरेदी सुरू, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस जाहीर

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स मंगळवार दिनांक 2 एप्रिल2024 रोजी 5 टक्के वाढीसह 588.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच अदानी पॉवर कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत 20 वर्ष कालावधीसाठी 500 MW वीज खरेदी करार केला असल्याची माहिती दिली आहे. ( अदानी पॉवर कंपनी अंश )

मागील वर्षी 6 डिसेंबर 2023 रोजी अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सने 589.30 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर एप्रिल 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 185.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी अदानी पॉवर स्टॉक 2.37 टक्के वाढीसह 602.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून तब्बल 218 टक्के मजबूत झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक वाटत आहेत. या मागील वर्षी डिसेंबर 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स उच्चांक पातळी विक्रीच्या दबावात आले होते. आता पुन्हा एकदा हा स्टॉक तेजीत वाढत आहे.

स्वस्तिक इन्व्हेस्टमार्ट फर्मच्या तज्ञांच्या मते, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी अदानी पॉवर स्टॉक खरेदी करताना 550 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावावा. या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 640 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. त्यानंतर हा स्टॉक 700 रुपये किमतीवर देखील जाऊ शकतो. जर हा स्टॉक विक्रीच्या दबावात आला तर शेअर 500 रुपये किमतीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE Live 03 April 2024.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x