12 December 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Adani Wilmar Share Price | डोंगराला आग लागली पळा-पळा! अदानी विल्मर कंपनीचा नफा 60% घसरला, शेअर सुद्धा धडाम

Adani Wilmar Share Price Today

Adani Wilmar Share Price | अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मरच्या निव्वळ नफ्यात मोठी घसरण झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2023 मध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा 93.6 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा २३४.३ कोटी रुपये होता. अशा परिस्थितीत वार्षिक आधारावर नफा 60% कमी आहे.

Adani Wilmar Limited Stock Price Today on NSE & BSE

त्याचबरोबर या तिमाहीत खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने कंपनीचा महसूल ७ टक्क्यांनी घसरून १३,८७३ कोटी रुपयांवर आला आहे. मागील वर्षी याच तिमाहीसाठी हा महसूल 14,917.3 कोटी रुपये होता. त्याचबरोबर कंपनीने पुन्हा एकदा अंगशु मलिक यांची सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली आहे. ते तीन वर्षे या पदावर राहतील.

वित्त वर्ष 2023 वेळी कंपनीची विक्री 5 मिलियन मेट्रिक टन पेक्षा अधिक होती. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये तांदूळ आणि गव्हाच्या पिठाची विक्री १,००० कोटी रुपयांच्या पुढे गेली. कंपनीच्या फूड सेगमेंटने अवघ्या दोन वर्षांत आपली विक्री दुप्पट केली आहे.

शेअरमध्ये घसरण :
तिमाही निकालानंतर अदानी विल्मरच्या शेअरची किंमत ५ टक्क्यांहून अधिक घसरली. ट्रेडिंग वेळी शेअरची किंमत 390 रुपयांच्या स्तरावर आली होती. त्याचबरोबर कंपनीचे मार्केट कॅप 51 हजार कोटी रुपयांवर आले आहे. अदानी विल्मर फॉर्च्युन ब्रँडअंतर्गत खाद्यतेलाची विक्री करते. याशिवाय ही कंपनी तांदूळ आणि साखर यासारख्या इतर खाद्यपदार्थांचीही विक्री करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Adani Wilmar Share Price Today on 03 May 2023.

हॅशटॅग्स

#Adani Wilmar Share Price Today(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x