11 December 2024 12:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर रॉकेट होणार, तेजीचे संकेत - NSE: NTPCGREEN BEL Share Price | डिफेंस शेअरमध्ये तेजीचे संकेत, मिळेल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: BEL
x

Ashish Kacholia Portfolio | मार्ग श्रीमंतीचा! 1200% परतावा देणारा अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन शेअरने मागील 5 दिवसात 22% परतावा दिला

Ashish Kacholia Portfolio

Ashish Kacholia Portfolio | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष काचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर जबरदस्त तेजीत वाढत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन स्टॉक 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. अग्रवाल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सनी गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 670 रुपये किंमत स्पर्श केली होती.

अग्रवाल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपल्या तिमाही निकालात वार्षिक सेल्स 660 कोटी रुपये साध्य केल्याची माहिती दिली आहे. तर तिमाही काळात अग्रवाल इंडस्ट्रीज कंपनीने 37 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. आज सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 10.99 टक्के वाढीसह 756.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन ही कंपनी मुख्यतः पेट्रोकेमिकल्स उत्पादन व्यवसायात गुंतलेली आहे. यासोबत ही कंपनीकडे एलपीजी आणि पवनचक्कीच्या माध्यमातून ऊर्जा निर्मितीचे आणि बिटुमन कोळसा लॉजिस्टिकचे काम देखील करते. 30 जून 2023 पर्यंत शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचोलिया यांनी अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीचे 3.93 टक्के भाग भांडवल धारण केले होते. आशिष कचोलिया यांनी मार्च 2023 तिमाहीपर्यंत अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनचे 3.82 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांची गुंतवणूक असलेल्या अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षात आपल्या शेअरधारकांना 650 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 57.98 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 5 दिवसात अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन कंपनीने आपल्या अल्पकालीन शेअर धारकांना 22.13 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 22.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मे 2020 रोजी हा स्टॉक 55 रुपये किमतीवर ट्रेड करत होता, या किंमत पातळीपासून अग्रवाल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन स्टॉक 1200 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashish Kacholia Portfolio Agarwal Industrial Corporation Share Price Today on 17 July 2023.

हॅशटॅग्स

#Ashish Kacholia Portfolio(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x